शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:36 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील इन्फ्रंट जिजस पब्लिक स्कूल मधील अल्पवयीन आदिवासी मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींची सीबीआय चौकशी करून आरोपींना फाशी देण्याची मागणी एका निवेदनातून आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील इन्फ्रंट जिजस पब्लिक स्कूल मधील अल्पवयीन आदिवासी मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींची सीबीआय चौकशी करून आरोपींना फाशी देण्याची मागणी एका निवेदनातून आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.राजुरा येथील इन्फ्रंट जिजस स्कूलमध्ये तिसरी व पाचव्या वर्गात शिकणाºया आदिवासी मुलींवर अत्याचार करण्यात आले. या प्रकरणात छगन पचारे याला अटक करण्यात आली. सदर शाळेत अनेक वर्षांपासून आदिवासी मुलींवर अत्याचार होत आहे. हे संपूर्ण प्रकरण राजकीय दबावात रितसर दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सीबीआयकडे चौकशी देण्यात यावी, या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा या निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना गोवर्धन कुंभरे, गणपतराव कडापे, अजाबराव चिचामे, अशोक उईके, धनलाल तिलगामे, ज्ञानेश्वर मडावी आदी उपस्थित होते.आंदोलनाचा इशाराआदिवासी मुलींवरील अत्याचार प्रकरणी योग्य कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा आदिवासी एम्प्लॉईज फेडरशेनच्या वतीने देण्यात आला आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी