शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर प्रचारयुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:01 IST

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहचणे कोणत्याही उमदेवाराला शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक उमेदवार सोशल मीडियाचा आधार घेत आहे. सोशल मीडियावरुन पोस्ट टाकून आपल्या ‘कार्यकर्तृत्वा’ची महत्ती मतदारापर्यंत पोहचविण्याची धडपड सुरू आहे. सध्या व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक उघडले की निवडणुकांचाच पोस्टचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देभंडारा-गोंदिया लोकसभा : फेसबुक आणि टिष्ट्वटरवरही पोस्टचा पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहचणे कोणत्याही उमदेवाराला शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक उमेदवार सोशल मीडियाचा आधार घेत आहे. सोशल मीडियावरुन पोस्ट टाकून आपल्या ‘कार्यकर्तृत्वा’ची महत्ती मतदारापर्यंत पोहचविण्याची धडपड सुरू आहे. सध्या व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक उघडले की निवडणुकांचाच पोस्टचा सामना करावा लागत आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुक अवघ्या आठवडाभरावर आली आहे. दोन जिल्ह्याचे क्षेत्र विस्ताराने मोठे आहे. सहा विधानसभा क्षेत्रात तब्बल १६०० गावे आहेत. रात्रंदिवस एक केला तरी उमेदवाराला प्रत्येक गावात जाणे शक्य नाही. मात्र निवडणुक तर जिंकायची आहे. मतदारापर्यंत पोहचायचे असल्याने वेगवेगळ्या प्रचार माध्यमांचा वापर केला जात आहे. अलीकडे प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आला आहे. या स्मार्ट फोनचा उपयोग प्रचारात मोठ्या खुबीने केला जात आहे. व्हॉटस्अ‍ॅप वरील ग्रुपच्या माध्यमातून उमेदवार आपले म्हणने जनतेपर्यंत पोहचवत आहे. प्रचारसभा, नेत्यांची भाषणे आणि विविध आश्वासनाचा पाऊस सध्या व्हॉटस्अ‍ॅपवर पडत आहेत. व्हॉटस्अ‍ॅप उघडले की धडाधड शेकडो मॅसेज येवुन पडत आहेत. पक्षीय उमेदवारासोबतच अपक्ष उमेदवारही यात आघाडीवर आहेत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात सध्या सोशल मीडियावरुन प्रचाराचा धुमाकूळ सुरु आहे. गावागावांत प्रचाराची रणधुमाळी अद्याप शिगेला पोहचली नाही. मात्र सोशल मीडियावर खडाजंगी सुरु आहे. निवडणूक आयोगाची सोशल मीडियावर करडी नजर आहे. सायबर सेलही त्यावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर जपुन करणे गरजेचे आहे.राष्ट्रीय विषयांवर शेरेबाजीराष्ट्रीय स्तरावर गाजणाऱ्या मुद्यांवर जोरदार शेरेबाजी सध्या सुरु आहे. टिकाटिपणीतून पक्षाची, उमेदवाराची इमेज तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. अनेक ग्रुपवर आता कार्यकर्त्यांत जुंपल्याचे दिसून येत आहे.नो पॉलिटिक्स प्लीज, पण लक्ष देतो कोण?स्मार्टफोनधारक व्हॉटस्अ‍ॅपच्या अनेक ग्रुपचे सदस्य आहेत. काही ग्रुप अ‍ॅडमिन आपला ग्रुप राजकारणापासून दुर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. सामाजिक विषयांवरुन तयार झालेल्या ग्रुपच्या अ‍ॅडमिनची सध्या चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. नो पॉलिटिक्स प्लीज, असे वारंवार संदेश टाकूनही याकडे कुणी लक्ष देत नाही. कारण सर्वत्र ज्वर चढला आहे तो राजकारणाचा. वारंवार सुचना देवुनही दररोज पोस्ट टाकणारे कुणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत सध्यातरी दिसत नाही. राजकीय वातावरण तापत असतांना सोशल मीडियावर हा प्रकार वाढतच जाणार.कार्यकर्त्यांत जुंपलीनिवडणुकीची खरी रंगत सोशल मीडियावर बघायला मिळत आहे. पक्ष आणि उमेदवारांवर सडकून टिका सुरु आहे. परस्पर विरोधी पक्षाचे कार्यकर्त्यांत सोशल मीडियावर चांगलीच जुंपल्याची दिसून येत आहे. आपलाच पक्ष कसा चांगला, आपला नेता कसा श्रेष्ठ हे सिध्द करण्याचा आटापिटा सुरु आहे.