शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक शौचालयाचे दरवाजे कुलूप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 22:40 IST

सिहोरा परिसरात अधिक लोकवस्ती असणाºया गावात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले असले तरी, या शौचालयाचे दरवाजे कुलूप बंद आहेत. ग्राम पंचायतीची उदासीनता दिसून येत असली तरी स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देगोदरीमुक्त अभियानाला हरताळ : स्वच्छतेसाठी ग्रामपंचायती पुढाकार घेणार

रंजित चिंचखेडे ।आॅनलाईन लोकमतसिहोरा (सिहोरा) : सिहोरा परिसरात अधिक लोकवस्ती असणाºया गावात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले असले तरी, या शौचालयाचे दरवाजे कुलूप बंद आहेत. ग्राम पंचायतीची उदासीनता दिसून येत असली तरी स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्यात येणार आहे.सिहोरा परिसरातील गावे आघाडी शासनाचे कार्यकाळात निर्मल ग्राम तथा हागणदारीमुक्त गावे झाली आहे. उर्वरित शौचालयाचे बांधकाम रोहयो अंतर्गत गावात करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य शासनाचे या उपक्रमाने रस्त्यावर दिसणारी घाण आता दिसत नाही. गावात गावकरी शौचालयाचा उपयोग करित असल्याचे चित्र सिहोरा परिसरातील ग्रामीण भागात आहे. गावात शौचालय बांधकामाचा उपक्रम राबविण्यात आल्यानंतर शहराचे धर्तीवर तीन हजार पेक्षा अधिक लोकवस्तीचे गावात सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्यात आले आहे.यात सिहोरा, चुल्हाड आणि बपेरा गावात अशी शौचालय बांधकाम करण्यात आली आहेत. परंतु शौचालय बांधकाम करण्यात आले असले तरी, त्यांचे दरवाजे सुरूवातीपासून कुलूप बंद आहेत. यामुळे या शौचालयाचा कुणी उपयोग करताना दिसून येत नाही. चुल्हाड गावात असणाऱ्या शौचालय शेजारी केर कचरा व मातीचे ढिगारे आहेत. यामुळे सार्वजनिक शौचालय दिसेनाशी झाली आहेत. ही शौचालय उपयोगितेविना पडून आहे.गावात असणाऱ्या या शौचालयाचे दुरूस्ती व स्वच्छेसाठी ग्रामपंचायत मार्फत पुढाकार घेतले जाणार असल्याची माहिती उपसरपंच इंद्रपाल सिंग सोलंकी यांनी दिली आहे. दरम्यान सिहोरा गावात आठवडी बाजाराचे शेजारी अशा शौचालयाचे बांधकाम करण्यात आली आहे. ही शौचालय कुलूप बंद असल्याने नागरिकांना त्याचा उपयोग होत नाही. बाजारात येणारे ग्राहक आणि विके्रत्याची धांदल होत आहे.जनतेच्या सेवा व उपयोगासाठी लाखो रूपये खर्चून बांधकाम करण्यात आलेले कुलूप बंद शौचालय खुले करण्याचा निर्णय सिहोरा ग्रामपंचायतचे सरपंच मधु अडमाचे यांनी घेतला आहे. या शौचालयात घाण निर्माण करणारे इसमावर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतले जाणार आहे.दरम्यान गावात खाजगी गाडे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु या गाडे बांधकाम धारकांनी दुकानदारासाठी स्वतंत्र शौचालय व मुत्रीघराची निर्मिती केली नाही. यामुळे भिंतीचे आडोसे मुत्रीघर ठरत आहेत.सिहोºयात सार्वजनिक शौचालय कुलूप बंद असली तरी ती नागरिकांचे उपयोगासाठी बांधकाम करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात शौचालयाचे दरवाजे खुली केली जाणार आहे. गावात स्वच्छता ठेवण्यासाठी गावकºयांचे सहकार्याची अपेक्षा आहे.-मधु अडमाचे, सरपंच सिहोरा.