संजय साठवणे साकोली अधिकारी व पदाधिकाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानाची दैनावस्था झाली आहे. लाखांदूर मार्गावरील खंडविकास अधिकाऱ्यांचे निवासस्थान तर बाजार चौकातील सभापतींचे शासकीय निवासस्थान सार्वजनिक शौचालय बनले आहे. परिणामी खंडविकास अधिकारी व सभापतींना भाड्याच्या घरात राहावे लागते.राज्य शासनाने येथील शासकीय कार्यालये व सदनिकांची देखभाल व दुरुस्तीकडे लक्ष देणे गरजेचे असताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथील कार्यालये व सदनिका दुर्लक्षित आहेत. पाच वर्षापूर्वी लाखांदूर मार्गावरील खंडविकास अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाला अचानक आग लागली. त्या आगीत ही सदनिका जळून खाक झाली होती. केवळ विटामातीच्या भिंती उभ्या राहिल्या. त्यानंतर या इमारतीच्या दुरुस्तीकडे वा नवीन बांधकामाकडे लक्ष देण्यात आले नाही.बाजार चौकात सभापती भवन बांधण्यात आले होते. मात्र दहा वर्षापूर्वी सभापती भवनालाही ग्रहण लागले. तेही भवन आता शौचालय झाल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
सभापती भवन बनले सार्वजनिक शौचालय
By admin | Updated: August 19, 2015 01:04 IST