शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तालुका अधिकाऱ्यांकडून लसीकरणासाठी गावागावांत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:27 IST

लाखांदूर : कोविड चाचणीदरम्यान तालुक्यात नियमित मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना नागरिकांकडून कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाकडे दुर्लक्ष केले ...

लाखांदूर : कोविड चाचणीदरम्यान तालुक्यात नियमित मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना नागरिकांकडून कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. सदर परिस्थितीत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करीत खुद्द तालुका अधिकाऱ्यांनी गावागावांत भोंगा वाजवून जनजागृती चालविली आहे.

शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत मागील काही महिन्यांपासून तालुक्यात ४५ वर्षे वयोगटावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. मात्र लसीकरणासंबंधाने विविध अफवांना बळी पडून हेतुपुरस्पर नागरिकांकडून लसीकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. या परिस्थितीत तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणअभावी कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे.

दरम्यान, या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागांतर्गत तालुक्यातील सर्वच गावांत लसीकरणासाठी जनजागृती केली जात आहे. तथापि लाखांदूरचे तालुका आरोग्याधिकारी डॉ. नलिनीकांत मेश्राम यांनी नागरिकांच्या लसीकरणासाठी खुद्द तालुक्यातील काही गावात जाऊन भोंगा वाजवून जनजागृती चालविली आहे.

दरम्यान, तालुक्यात गत काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्येत दिसून येणारी वाढ कमी करण्यासाठी तालुक्यातील ४५ वर्षे वयोगटावरील सर्वच नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले जात आहे.