शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृतीच आपत्ती व्यवस्थापनाचा मूलमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:45 IST

आपत्ती विविध प्रकारची असून दुष्काळ, पूरपरिस्थिती, रस्ते अपघात व आग अशा स्वरुपाच्या आपत्ती या आपल्याकडे महत्वाच्या आपत्ती असून एखाद्या गोष्टीची माहिती असणे हे सुद्धा आपत्ती व्यवस्थापन आहे.

ठळक मुद्देआपत्ती व्यवस्थापन सप्ताह साजरा करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आपत्ती विविध प्रकारची असून दुष्काळ, पूरपरिस्थिती, रस्ते अपघात व आग अशा स्वरुपाच्या आपत्ती या आपल्याकडे महत्वाच्या आपत्ती असून एखाद्या गोष्टीची माहिती असणे हे सुद्धा आपत्ती व्यवस्थापन आहे. खºया अर्थाने जनजागृतीच आपत्ती व्यवस्थापनाचा मूलमंत्र असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी व्यक्त केले.९ आॅक्टोबर ते १३ आॅक्टोबर दरम्यान आपत्ती व्यवस्थापन सप्ताह साजरा करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. आपत्ती व्यवस्थापन सप्ताहाचा जिल्हाधिकारी कार्यालय येथे औपचारिकरित्या शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.आपत्ती व्यवस्थापन सप्ताह निमित्त ९ आॅक्टोबर ते १३ आॅक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. आपत्ती व्यवस्थापनाची माहिती देणाºया कलापथकाने आज या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, आपत्ती ही सांगून येणारी घटना नसून त्यासाठी सदासर्वदा सजग असणे महत्वाचे आहे. आपल्याकडे साधारणत: रस्ते अपघात, दुष्काळ, पूरपरिस्थिती, आग, आजाराची साथ, चेंगराचेंगरी अशा प्रकारच्या आपत्ती घडतात. आपत्ती व्यवस्थापनाचा मूलमंत्र म्हणजे नागरिकात जागृती करणे होय. यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचाºयांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने १५५ शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हास्तरीय अधिकाºयांना सुद्धा प्रशिक्षण देण्यासाठी कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाºयांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेऊन इतरांना प्रशिक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. आपत्ती व्यवस्थापन सप्ताहात पथनाट्य, वादविवाद स्पर्धा, वर्क्तृत्व स्पर्धा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. आपण एखाद्या जीव जरी वाचवू शकलो तरी आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य आपल्या हातून घडेल असे जिल्हाधिकारी म्हणाले. येणारा काळ हा आपत्ती व्यवस्थापनाचा काळ असून दुष्काळ, पूर व रस्ते अपघात या आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रत्येकाने प्रशिक्षित व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.