लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात आयुध निर्माण भंडारा, जवाहरनगर येथे अखिल भारतीय डिफेंस एम्प्लॉइज फेडरेशन संलग्न आॅर्डनन्स फॅक्टरी एम्प्लॉईज युनियन व आयएनडीडब्लूएफ संलग्न न्यू एक्स्पोझिव्ह फॅक्टरी वर्क्स युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने देशव्यापी एक तास रास्ता रोको करण्यात आले. त्यानुसार मेन गेट समोर प्रदर्शन करण्यात आले.भारतात ४ लक्ष ‘सिव्हीलियन’ कर्मचारीद्वारे भारत सरकारच्या वर्तमान विरोधी धोरणाचा विरोध करण्यात आला. आयुध निर्माणी मधील उत्पादीत होणारे उत्पादन हे खासगी कंपन्यांत उत्पादन करण्यास मंजूरी देण्यात आली. यात देशभरातील ४१ आयुध फॅक्ट्री व ५२ डीआरडीओ आयुध प्रयोगशाळा खासगी विदेशी कंपनीला देण्यात येत आहे. परिणामी २५ आयुध फॅक्ट्रीमधील २० हजार पेक्षा कामगार घरी बसण्याच्या, बेरोजगार होण्याच्या तयारीत आहेत. आयुध निर्माणीच्या कामगारांच्या हाती असलेली देशाची सुरक्षा ही खासगी कंपन्यांच्या हातात गेली तर कामगारांचे किंबहुना देशाची सुरक्षा धोक्यात येण्याची चिन्ह आता दिसू लागली आहे. राष्ट्रव्यापी रक्षा धोरणाच्या विरोधात अखिल भारतीय स्तरावर एक तास उशिरा कारखान्यात प्रवेश करीत सरकारच्या धोरणाविरोधात प्रदर्शन घोषणाबाजी करण्यात आली. यात आयुध निर्माणी एम्प्लॉइज युनियन व न्यु एक्स्प्लोसिव्ह फॅक्ट्री वर्क्स युनियन यांचे पदाधिकारी कॉमरेड किशोर आकरे, अजय बोरकर, हसन शेख, पारस भिमटे, कैलाश घरडे, कैलाश जगताप, विजय बागडे, विशाल मदनकर, सुरेश मौर्या, शिरीश साखरे, हरिश भुते, चर्चिल कांबळे, हितेश बावनकुळे, नाना जेठे, आर.पी.रॉय, कुंदन चवरे, सुशिल बागडे, कोडापे, नारनवरे, घरडे, निलेश भोळे यांचा समावेश होता.
कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ आंदोलन
By admin | Updated: May 25, 2017 00:15 IST