शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' लाठीमाराचा मुख्याध्यापक संघाकडून निषेध

By admin | Updated: October 7, 2016 00:52 IST

विनाअनुदानित शाळा कृती समितीने औरंगाबाद येथे काढण्यात आलेल्या शिक्षकांच्या मोर्च्यावर पोलिसांनी लाठी हल्ला केला.

निवेदन : खंडविकास अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे तक्रारमोहाडी : विनाअनुदानित शाळा कृती समितीने औरंगाबाद येथे काढण्यात आलेल्या शिक्षकांच्या मोर्च्यावर पोलिसांनी लाठी हल्ला केला. त्या लाठीमाराचा निषेध मोहाडी मुख्याध्यापक संघ व प्राथमिक शिक्षक संघटनेच्या कृती समितीने केला. निषेध व मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना खंड विकास अधिकारी गजानन लांजेवार यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे.कायम विनाअनुदानित व विनाअनुदानित तत्वावर शासन मान्यता दिलेल्या शाळांना व वर्ग तुकड्यांना देण्यासाठी शाळांचे मुल्यांकन करण्यात आले. या मुल्यांकन झाल्यावर अनुदानास पात्र शाळांना अनुदान दिले गेले नाही. त्यानंतर शिक्षकांनी आंदोलने केली. त्यानंतर शासनाने १९ सप्टेंबर २०१६ ला निर्णय निर्गमित केला. मात्र शासन निर्णयातून शिक्षकांना वेतनच मिळू नये अशा जाचक अटी लाटून शिक्षकांना अनुदानापासून वंचित ठेवले जात आहे. त्यासाठी औरंगाबाद येथे विना अनुदानित शिक्षकांनी शांततेने मोर्चा काढला. पण, शासनाच्या दबावाखाली पोलिस प्रशासनाने शिक्षकांचा मोर्चा दडपण्यासाठी लाठीमार केला. त्यात अनेक शिक्षक जखमी झाले. शिक्षकांच्या मोर्च्यावर जो लाठीमार झाला त्याचा निषेध मोहाडी तालुका मुख्याध्यापक संघ व प्राथमिक शिक्षक संघाच्या कृती समितीने केला. यावेळी मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यंचे नावे दिलेल्या निवेदनातून निषेध नोंदवून १९ सप्टेंबर २०१६ चा शासन निर्णय रद्द करा अथवा जाचक अटी काढून टाका तसेच शिक्षकांना तात्काळ अनुदान देण्यात यावे, असे निवेदन मुख्याध्यापक संघाचे गोपाल बुरडे, राजकुमार बांते, प्राथमिक शिक्षक कृती समितीचे अनिल गयगये, किशोर ईश्वरकर, प्रकाश महालगावे, कोमल चव्हाण, विजय चाचेरे, प्रदीप शेंडे, विठ्ठल गभणे, वसंता धांडे, प्रभाकर बांते, संजय भांडारकर, हेमराज राऊत, गजानन वैद्य, हिवराज राऊत, राजू डोये, किशोर चोपकर, गोविंद आव्हाड, मोहन वाघमारे, कमलेश कनपटे, शरद शेंडे, जैपाल चामट यांच्या शिष्टमंडळाने खंडविकास अधिकारी मोहाडी यांना निवेदन सादर केले. (तालुका प्रतिनिधी)