शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' घटनेच्या निषेधार्थ सिहोरात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 22:09 IST

बाजार चौक सिहोरा येथील दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर आणि नाग मंदिराचे लगत असणाऱ्या पुरातन बाहुली विहिरीत जनावरांच्या मांसाचे तुकडे घालण्यात आले होते. या निषेधार्थ विविध संघटना, गावकरी व सर्व दलीय पक्षाचे वतीने सिहोरा शंभर टक्के व कडकडीत बंद पाळण्यात आला. भर पावसातही गावातून रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देविविध संघटनांची गावात रॅली : व्यापारी प्रतिष्ठान, शाळा, कॉलेज बंद

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : बाजार चौक सिहोरा येथील दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर आणि नाग मंदिराचे लगत असणाऱ्या पुरातन बाहुली विहिरीत जनावरांच्या मांसाचे तुकडे घालण्यात आले होते. या निषेधार्थ विविध संघटना, गावकरी व सर्व दलीय पक्षाचे वतीने सिहोरा शंभर टक्के व कडकडीत बंद पाळण्यात आला. भर पावसातही गावातून रॅली काढण्यात आली.सिहोरा येथील बाजार चौकात दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर व नाग मंदिर आहे. या मंदिराचे शेजारी घराची दाट वस्ती असून देवस्थानचे लगत पुरातन बाहुली विहिर आहे. या बाहुली विहिरीत अज्ञात समाज कंटकांनी जनावरांच्या मांसाचे तुकडे घातले. शनिवारला आठवडी बाजार असल्याने नागरिकांची वर्दळ बाजारात वाढली असता विहिरीतून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी विहिरीत डोकावून बघितले.विहिरीतील पाण्यावर जनावरांचे मांसाचे तुकडे तरंगत असल्याचे दिसून येताच गावकरी गोळा झाले. नागरिकांच्या भावना दुखावण्यात आल्याने आरोपीला तात्काळ अटक करण्याची ओरड सुरु झाली. वाढता तणाव लक्षात घेता विहिरीची स्वच्छता करण्यात आली तथा जनावरांचे मांसाचे तुकडे चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आले. आराध्य दैवत तथा श्रद्धास्थान असणाºया देवस्थानच्या शेजारील विहिरीत असा प्रकार घडला असल्याच्या कारणावरून आरोपीला अटक करण्याची मागणी गावकºयांनी केली.या घटनेच्या निषेधाथर विविध राजकीय पक्ष, विश्व हिंदू परिषद शाखा, बजरंग दल शाखा आणि गावकºयांचे वतीने आज मंगळवारला सिहोरा बंद पुकारण्यात आला आहे. सकाळपासून व्यापारी प्रतिष्ठान, शाळा, कॉलेज तथा अन्य संस्थांनी कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे. अज्ञात समाज कंटकाचे निषेध नोंदविण्यासाठी पावसाची रिपरिप सुरु असताना दुर्गा मंदिरात गावकरी एकत्र आले. पूजा अर्चना करून गावात रॅलीची सुरुवात करण्यात आली. गावाला भ्रमण करीत पुन्हा रॅली मंदिरात पोहचली. मंदिरात आयोजित सभेला जिल्हा परिषद सभापती धनेंद्र तुरकर, सरपंच मधु अडमाचे, मयुरध्वज गौतम, गजानन निनावे, बजरंग दलचे पंकज शुक्ला, यशवंत हेडावू, गोपाल येळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आरोपीला तात्काळ करण्यात यावी अन्यथा मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांनी गावकº यांना अज्ञात आरोपींचे विरोधात भादंवि ४९९ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची शोध मोहीम सुरु असल्याची माहिती दिली आहे. यानंतर गावात शांतता ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. गावात कडकडीत बंद पाळण्यात येत असताना तणावाचे वातावरण व ढवळून निघणार याची याची दक्षता घेत पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवित चोख बंदोबस्त ठेवला आहे.