शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

प्रचार तोफा थंडावल्या, खऱ्या प्रचाराला गावागावांत प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल ११ डिसेंबर रोजी फुंकण्यात आला होता. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा करताच गावागावात उत्साह संचारला होता. जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित करण्यात आली. त्यात साकोली १८, मोहाडी १७, भंडारा ३५, पवनी २७, लाखनी २०, साकोली २० आणि लाखांदूर तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ४६१ प्रभागातून १,२३६ सदस्य निवडणूक द्यावयाचे आहेत. त्यासाठी २,७४५ उमेदवार रिंगणात आहेत.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : १४८ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी ५ वाजता थंडावल्या आणि खऱ्या अर्थाने गावागावात प्रचाराला प्रारंभ झाला. कत्तल की रात म्हणून गुरुवारची रात्र ओळखली जाणार असून या रात्री केलेल्या नियोजनावरच विजयाचे गणित अवलंबून असते. मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले असून जिल्ह्यातील ४६८ केंद्रांवर १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळात मतदान होणार आहे. जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल ११ डिसेंबर रोजी फुंकण्यात आला होता. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा करताच गावागावात उत्साह संचारला होता. जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित करण्यात आली. त्यात साकोली १८, मोहाडी १७, भंडारा ३५, पवनी २७, लाखनी २०, साकोली २० आणि लाखांदूर तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ४६१ प्रभागातून १,२३६ सदस्य निवडणूक द्यावयाचे आहेत. त्यासाठी २,७४५ उमेदवार रिंगणात आहेत. तुमसर तालुक्यातील १६० जागांसाठी ३८६ उमेदवार, मोहाडी तालुक्यातील १४१ जागांसाठी ३४९ उमेदवार, भंडारा तालुक्यातील ३०५ जागांसाठी ६८५ उमेदवार, पवनी तालुक्यातील २१५ जागांसाठी ४४८ उमेदवार, लाखनी तालुक्यातील १५६ जागांसाठी ३२४ उमेदवार, साकोली तालुक्यातील १६० जागांसाठी २९४ उमेदवार आणि लाखांदूर तालुक्यातील ९० जागांसाठी २२३ उमेदवार रिंगणात आहेत. गत ५ जानेवारीपासून प्रचाराला प्रारंभ झाला होता. गावागावांत या निवडणुकीने वातावरण चांगलेच तापले होते. बुधवार १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता या निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या. मात्र ग्रामीण भागात शेवटच्या रात्रीच खरा प्रचार केला जातो, असा आजवरचा अनुभव आहे. सर्व उमेदवार आणि त्यांचे पाठीराखे गुरुवारच्या रात्री विजयाचे गणित जुळविण्यात मग्न होणार आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने मतदानाची संपूर्ण तयारी केली आहे. जिल्ह्यातील ४६८ मतदार केंद्रांवर निवडणूक होणार आहे. त्यात तुमसर ५९, मोहाडी ५२, भंडारा १११, पवनी ८२, लाखनी ६८, साकोली ६१ आणि लाखांदूर तालुक्यात ३५ मतदार केंद्रांचा समावेश आहे. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजतापासून मतदानाला प्रारंभ होणार असून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.

ग्रामपंचायत क्षेत्रात स्थानिक सुटी जाहीर ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी शुक्रवार १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत क्षेत्रात मतदानासाठी सार्वजनिक सुटी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी जाहीर केली आहे. १५ जानेवारी हा कामकाजाचा दिवस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यातील केवळ सार्वत्रिक निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयांना मतदानासाठी सुटी जाहीर केली आहे. 

तीन दिवस मद्य विक्री बंद जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे १४ जानेवारी मतदानपूर्वीचा दिवस, १५ जानेवारी मतदानाचा दिवस आणि १८ जानेवारी मतमोजणीचा दिवस या तीनही दिवशी मद्य विक्री बंद राहणार आहे. तीन दिवस सात तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक