शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारताेफा थंडावल्या, प्रत्यक्ष भेटीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 05:00 IST

जिल्हा परिषदेच्या ३९ जागांवर २४५ उमेदवार आपले भाग्य आजमावित आहेत. त्यात १३६ पुरुष तर १०९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. पंचायत समितीच्या ७९ जागांसाठी ४१७ उमेदवार असून, त्यात २२८ पुरुष तर १८९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. निवडणूक चिन्ह वाटपापासून प्रचाराला प्रारंभ झाला; मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून निवडणूक हाेणार की नाही, अशी शंका हाेती. शुक्रवारी निवडणूक हाेणार, हे निश्चित झाल्यावर खऱ्या अर्थाने प्रचाराला प्रारंभ झाला.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारताेफा रविवारी रात्री थंडावल्या असून, आता साेमवारी उमेदवार मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर देणार आहे. मंगळवारी प्रत्यक्ष मतदान हाेणार आहे. जिल्ह्यातील ३९ गट आणि ७९ गणांमध्ये अटीतटीची लढत हाेत असून, काेण बाजी मारणार, याची गावागावांत चर्चा सुरू आहे.जिल्हा परिषदेच्या ३९ जागांवर २४५ उमेदवार आपले भाग्य आजमावित आहेत. त्यात १३६ पुरुष तर १०९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. पंचायत समितीच्या ७९ जागांसाठी ४१७ उमेदवार असून, त्यात २२८ पुरुष तर १८९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. निवडणूक चिन्ह वाटपापासून प्रचाराला प्रारंभ झाला; मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून निवडणूक हाेणार की नाही, अशी शंका हाेती. शुक्रवारी निवडणूक हाेणार, हे निश्चित झाल्यावर खऱ्या अर्थाने प्रचाराला प्रारंभ झाला. प्रत्येक उमेदवाराने आपल्या मतदार संघात गावाेगावी जावून आपली भूमिका पटवून दिली. प्रचारासाठी राज्यस्तरीय नेत्यांच्या सभा आयाेजित करण्यात आल्या. रविवारी, रात्री १२ वाजता या प्रचारताेफा थंडावल्या; मात्र दिवसभर ठिकठिकाणी नेत्यांच्या सभा झाल्या. प्रचारताेफा थंडावल्या असल्या तरी साेमवार हा एक दिवस उमेदवारांच्या हाती असल्याने मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर दिला जाणार आहे.जिल्ह्यात सर्वच गट आणि गणात अटीतटीची लढत हाेत आहे. काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चाैरंगी लढतीचे चित्र आहे. अपक्षांनीही या निवडणुकीत रंगत आणली असून, तिकीट न मिळाल्याने बंडखाेरी करणारे उमेदवार पक्षाच्या अधिकृत उमेदवारासाठी डाेकेदुखी ठरत आहे. त्यांना थांबविण्याचा वरिष्ठांकडून प्रयत्न करण्यात आला, तरी ते ऐकण्याच्या तयारीत नाही. काेण बाजी मारणार,  यावर चर्चा सुरू आहे. 

६६२ उमेदवार, पाच लाख ९४ हजार मतदार- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणात ६६२ उमेदवार आहेत. त्यात जिल्हा परिषदेचे २४५ तर पंचायत समितीच्या ४१७ उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांचे भवितव्य पाच लाख ९४ हजार ४५३ मतदारांच्या हाती आहे. तीन लाख एक हजार १७० पुरुष तर दाेन लाख ९३ हजार २८३ महिला मतदार आहेत. मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचे माेठे दिव्यही उमेदवारांना पार पाडावे लागणार आहे.

निवडणूक निरीक्षकांकडून पाहणी- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक अनिल पाटील यांनी जिल्ह्यातील मतदान केंद्रांची पाहणी केली. यासाेबत स्ट्राँग रूमचीही पाहणी केली. तुमसर येथे भेट दिली असता, त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी हरीश भांबरे उपस्थित हाेते.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद