शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाने रोवणी मजुरांचे भाव वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 01:20 IST

पालांदूर परिसरात पावसाने प्रारंभी पाठ दाखविली होती. तरीही ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे.

मजुरांची टंचाई : बाहेरगावावरून आवक, मजुरी १५० ते २०० रूपये,अनेक ठिकाणी रोवणी अंतिम टप्प्यातमुखरू बागडे । लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : पालांदूर परिसरात पावसाने प्रारंभी पाठ दाखविली होती. तरीही ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे. अशांनी रोवणी आटोपती घेतली. मंगळवारला पावसाने दमदार हजेरी लावली व उर्वरित रोवणी धडाक्यात सुरू झाली.पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पळाला होता. मात्र, मंगळवारला पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी आता कामाला लागले आहे. गावातील महिला मजुर व ट्रॅक्टर कामात लागले असून कोरडवाहूची रोवणी हप्त्याभरात पूर्णत्वाला जाणार आहे. पालांदुरात बाहेरगावरून मजुरांची आवक वाढली असून सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतच्या रोवणीच्या कामाचे १५० ते २०० रूपये मजुरी देण्यात येत आहे.पालांदूर परिसरातील शेतकरी सुजाणकीला असून शेतीकडे नफ्याच्या दृष्टीने बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन पाठवला आहे. पावसाचा वेध शेतीची मशागत, मंडळ कृषी कार्यालयाशी सलगी, पदवीधर कृषी विज्ञानाशी मैत्री करीत धानशेती अत्याधुनिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न वाढला आहे. पालांदुर परिसरात रोवणी अधिक स्वरूपात आटोपली असून केवळ १०-१२ दिवसांच्या पऱ्यांची रोवणी केल्याने फुटल्यांची संख्या वाढणार आहे. रासायनिक खतातही सुधारणा करून मृदेचे आरोग्य तपासूनच खतांच्या मात्रा वापरत आहेत. धानपिकाला लागणारे १६ अन्नघटकांची पूर्तता पूर्ण करण्याचा प्रयत्न मंडळ कृषी कार्यालय व कृषी सेवा केंद्रच्या माध्यमातून होत आहे. मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोळके यांच्या प्रयत्नातून इसापूर, मांगली, मचारणा गावात यांत्रिकपद्धतीने रोवणीचे नियोजन केले असून नर्सरीसुद्धा बेड गादीवाफेवर टाकले आहेत. शाश्वत शेती समृद्ध शेतकरीचा अभिनव प्रयोगातून कमी खर्चात अधिक नफ्याची धानाची शेती पुढे येत आहे.बागायती शेतीत भाजीपाल्याची शेती सुद्धा पुढे आली असून पालांदुरचा भाजीपाला थेट इतर राज्यात विकला जात आहे. रोवणीला गती मिळाली आहे.