शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गियांचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मुंबई उच्च न्यायालयाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, जमाती, विशेष मागासप्रवर्ग व इतर मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतून आरक्षणाला अवैध ठरवून सन २००४ पासून आरक्षणाद्वारे पदोन्नती झालेल्या कर्मचारी व अधिकाºयांना पदावनत करण्याचा निर्णय दिला आहे.या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील करावे व यासाठी अभ्यासू, कायदेतज्ज्ञ विशेष वकीलाची ...

ठळक मुद्देअन्यथा आंदोलनाचा इशारा : कास्ट्राईब महासंघाचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मुंबई उच्च न्यायालयाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, जमाती, विशेष मागासप्रवर्ग व इतर मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतून आरक्षणाला अवैध ठरवून सन २००४ पासून आरक्षणाद्वारे पदोन्नती झालेल्या कर्मचारी व अधिकाºयांना पदावनत करण्याचा निर्णय दिला आहे.या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील करावे व यासाठी अभ्यासू, कायदेतज्ज्ञ विशेष वकीलाची नियुक्ती करून मागासवर्गीयांना न्याय मिळवून द्यावा असा निर्णय महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ भंडारा जिल्ह्याचा कार्यकारिणीच्या सभेत घेण्यात आला. एवढेच नव्हे तर वातावरण निर्मितीतून लोकजागृती निर्माण करण्यासाठी विविध संघटना, संस्थांच्या सहकार्याने सभा, संमेलन व निदर्शने करून निवेदन देऊन आणि प्रसंगी आंदोलन उभारून मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात त्वरीत अपील करण्यास बाध्य करण्याचा निर्धारही या सभेत व्यक्त करण्यात आला. या मागणीकरिता मागासवर्गीयांसाठी झटणाºया जिल्हा व राज्यभरातील संस्था व संघटनांनी ठिकठिकाणी निवेदने द्यावीत असे आवाहनसुद्धा कास्ट्राईब महासंघाने केले आहे.कास्ट्राईबचे संस्थापक सदस्य व राज्याचे ज्येष्ठ उपाध्यक्ष अमृत बन्सोड यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या कास्ट्राईबच्या जिल्हा कार्यकारिणीच्या या सभेत अंशत: बदल करून माजी शिक्षणाधिकारी रामचंद्र अंबादे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांचा शाल, ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.जिल्हाध्यक्ष गुलशन गजभिये यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला तर सचिव नरेंद्र बन्सोड यांनी आभार मानले. सभेत केंद्रीय ज्येष्ठ उपाध्यक्ष अमृत बन्सोड, जिल्हा उपाध्यक्ष पी.डी. शहारे, उपाध्यक्ष आदिनाथ नागदेवे, मुख्य संघटन सचिव रुपचंद रामटेके, सहसचिव अशोक बन्सोड, अतिरिक्त सचिव प्रा.मोरेश्वर गेडाम, संघटन सचिव प्रा.ए.पी. गोडबोले, उपाध्यक्ष कुंदा भोवते, प्रकाश ओईंबे, दादू कांबळे, डी.एम. मडामे, सचिव आनंद गजभिये उपस्थित होते.