यावेळी देशाचे रक्षण करून सैन्यातून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित माजी सैनिकांनी सैन्य दलात काम करत असताना त्यांना आलेले अनुभव, त्याचबरोबर विद्यार्थी-विद्यार्थिनींना सैन्य दलात रुजू होण्याच्या वेगवेगळ्या संधीबाबत मार्गदर्शन केले. देशभक्तीपर गीत, भाषण, कविता इत्यादी गोष्टीत विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन देशप्रेमाचे धडे दिले. या कार्यक्रमात जिल्हा परिषद डोंगरगाव व गुरुदेव बिसने कनिष्ठ महाविद्यालय, मोहाडी येथील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाची सांगता प्रेरणादायी देशभक्ती गीताने करण्यात आली.
सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक माधव मोटघरे, विजय पेशने, गणपत शेबे, पत्रकार सिराज शेख तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अविनाश चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी तालुका व्यवस्थापक विशाल कुंभकर्ण, प्रशिक्षक छाया गुरव, शाळा सहाय्यक अधिकारी नितीन कोल्हे, शिवराज कावडकर, अंकुश मंगळे, प्रशांत पाटील, दीपक गावंडे, समुदाय समन्वयक त्रिवेणी समरीत, तारा हेडावू, अश्विनी अंबिलडुके, शुभांगी मोटघरे, भरत गभने इत्यादींनी परिश्रम घेतले.