अशोक कापगते यांचा पाठपुरावासाकोली : कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना १२ वीनंतर पुढील उच्च शिक्षणाकरिता जातपडताळणी करावी लागते. जातवैधता प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना मुळ कागदपत्रे नागपुर येथे न्यावी लागत होती. ही विद्यार्थ्यांसाठी अडचणीची व त्रासदायक बाब होती. विद्यार्थ्यांचा हा त्रास वाचावा याकरीता जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते यांनी जातपडताळणी कार्यालय नागपूर कार्यालयात जाऊन ही अडचण दूर केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता नागपूरला जावे लागणार नाही.११ वी व १२ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना १२ वीनंतर पुढील उच्च शिक्षणाकरिता मागासवर्गीय विद्यार्थ्याकरीता जात पडताळणी करून घ्यावी लागते व याकरिता दरवर्षीप्रमाणे १२ वीत शिकणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालय यामधून त्यांचे जात वैधता प्रमाणपत्राकरीता महाविद्यालयामार्फत संशोधन अधिकारी जात पडताळणी विभागीय समिती समाजकल्याण विभाग नागपूर यांचेकडे अर्ज सादर करावा लागतो. परंतु यावर्षी सण २०१६-१७ मध्ये नागपूर येथील कार्यालयामधून विद्यार्थ्यांचे मुळ कागदपत्रे स्कॅन करावयाची असल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांनी अर्ज स्विकारू नये तर विद्यार्थ्यांनीच परस्पर आपल्या मुळ कागद पत्रासहीत नागपूर येथील कार्यालयात उपस्थित व्हावे, असा तोंडी आदेश काढला. त्यामुळे बऱ्याच कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नागपूर येथे पाठविण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोन ते तीन दिवस विनाकारण त्रास सहन करावा लागला. या विरोधात भंडारा येथील काँग्रेसचे पदाधिकारी साखरकर, जि.प. सदस्य प्यारेलाल वाघमारे यांनी शिक्षण समिती सदस्य अशोक कापगते यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडल्या. त्यावर कापगते यांनी नागपूर येथील संशोधन अधिकारी राजे बांडे व पवार विभागीय जात पडताडणी नागपूर यांच्याशी चर्चा केली व परिस्थिती समजावून सांगितली. विद्यार्थ्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुर्वीचीच पद्धती लागू करावी, अशी मागणी केली. आवश्यक कागदपत्रे व जातवैधता अर्ज आता महाविद्यालयीन मार्फतच नागपूर कार्यालयात पाठविण्यात येणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)
जात पडताळणीची समस्या सुटली
By admin | Updated: August 11, 2016 00:31 IST