शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

तुमसरच्या बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची दुरावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:22 IST

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे तुमसर पंचायत समिती कार्यालयाच्या दर्शनी भागातील लाखोंच्या उद्यानाची सध्या दूरावस्था झाली आहे. येथील महागडे गवत आगीत स्वाहा झाले आहे. दर्शनी भागात सात हजारांचे एलईडी लाईट उधारीवर बाबासाहेबांच्या जयंतीदिनी पंचायत समिती सदस्यांनी खरेदी करून लावले. त्याचे बिल अद्याप मंजूर झाले नाही. भीषण उष्णतेत उद्यानातील झाडे शेवटची घटका मोजत आहेत.

ठळक मुद्देउद्यानातील गवत आगीत स्वाहा : एलईडी लाईट बिल मंजुरीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे तुमसर पंचायत समिती कार्यालयाच्या दर्शनी भागातील लाखोंच्या उद्यानाची सध्या दूरावस्था झाली आहे. येथील महागडे गवत आगीत स्वाहा झाले आहे. दर्शनी भागात सात हजारांचे एलईडी लाईट उधारीवर बाबासाहेबांच्या जयंतीदिनी पंचायत समिती सदस्यांनी खरेदी करून लावले. त्याचे बिल अद्याप मंजूर झाले नाही. भीषण उष्णतेत उद्यानातील झाडे शेवटची घटका मोजत आहेत. ग्रामीण परिसराला न्याय देण्याची ग्वाही सदर कार्यालय देते, परंतु उद्यानाला येथे बचावाकरिता प्रयत्न करताना दिसत नाही.सुमारे पाच ते सहा वर्षापुर्वी तुमसर पंचायत समिती कार्यालयासमोर लाखो रूपये खर्च करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावाने देखणे उद्यान तयार करण्यात आले होते. महामानव डॉ. बाबासाहेबांचा देखना पुर्णाकृती पुतळा येथे लावण्यात आला. फुलझाडे, महागडे गवत येथे लावण्यात आले. पंचायत समिती कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्यांचे सदर उद्याण लक्ष वेधून घेत होते. परंतु सध्या सदर उद्यानाची दूरावस्था झाली आहे. येथील महागडे गवताला कुणीतरी आग लावली आहे. अर्धे गवत जळालेल्या स्थितीत आहे. फुलझाडे व इतर नाजूक झाडे शेवटची घटका मोजत आहेत. सध्या तीव्र उन्हाळा असून त्याचा फटका उद्यानातील झाडांना बसत आहे. उद्यानाच्या बचावाकरीता काही ठोस कारवाई येथे करताना कुणी दिसत नाही.झाडे लावा, झाडे जगवा असे संदेश केंद्र व राज्य शासन प्रत्येक गावात देत आहे. ग्रामीण परिसरातील तालुका मुख्यालय असलेल्या पंचायत समिती कार्यालयासमोरील उद्यानाकडे दुर्लक्ष केले जात आहे. उद्यानातील एलईडी लाईट निकामी झाले होते. १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या जयंतीदिनी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे व त्यांच्या सहकारी सदस्यांनी सात हजारांचे एलईडी लाईट उधारीवर खरेदी करून आणले. त्याचे बिल येथे अजून देण्यात आले नाही. अंधारातून प्रकाशाकडे नेणाºया महामानवालाच येथे अंधारात ठेवले जात होते. ही मोठी शोकांतिका आहे. तालुक्याचे कागदपत्रे, दप्तर येथे यामुळे सुरक्षीतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.वृक्षांना वाचविण्याचे आवाहनभीषण उन्हात फुलझाडे व इतर झाडांना दररोज टँकरने पाणीपुरवठा करून झाडांना वाचविण्याकरिता पंचायत समिती प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे. निधीची कुरकुर करता कामा नये, उद्यान बाचावाकरिता पं.स. कार्यालयाने किमान वर्गणी येथे काढून तालुक्यात चांगला संदेश द्यावा, केवळ कागदोपत्री कामे केल्याने ग्रामीण भागात संदेश जाणार नाही. लाखो रूपये खर्च करूनहे उद्यान तयार करण्यात आले. याचे भान ठेवण्याची खरी गरज आहे. तत्कालीन प्रभारी खंडविकास अधिकारी डॉ. शांताराम चाफले यांच्या कार्यकाळात सदर उद्यान तयार करण्यात आले होते हे विशेष. उद्यानाची दूरावस्था थांबवावी, अशी मागणी पं.स. सदस्य हिरालाल नागपुरे, राकाँचे तालुकाध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारे यांनी केली आहे.पंचायत समिती कार्यालयासमोरील उद्यानाची दूरावस्था झाली असून एलईडी लाईटचे बिल अजून देण्यात आले नाही. उद्यान बचावाकरिता अधिकारी व कर्मचाºयांनी प्रयत्न करावा.-हिरालाल नागपुरे, पं.स. सदस्य तुमसर.एलईडी लाईट खरेदी केल्याचे बिल पंचायत समितीच्या मासिक सभेत पं.स. सदस्यांनी ठेवावे. मासिक सभेत त्यावर चर्चा करून तोडगा काढण्यात येईल. पाण्याचे टँकरबाबत निर्णय घेण्यात येईल.-ए.पी. मोहोड, खंडविकास अधिकारी तुमसर.