शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

सैनिक कुटुंबीयांच्या प्रश्नांना प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2017 00:28 IST

अतिशय विषम परिस्थितीत सैनिक देशहिताच्या रक्षणासाठी लढत असतात.

जिल्हाधिकारी : ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभभंडारा : अतिशय विषम परिस्थितीत सैनिक देशहिताच्या रक्षणासाठी लढत असतात. त्यांच्यासाठी काहीतरी करणे हे आपले कर्तव्य असून सिमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या कुटूंबियांचे प्रश्न व समस्या प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी प्राधान्याने सोडवाव्या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमात बोलत होते.जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात सशस्त्र सेना ध्वजदिन २०१६ निधी संकलन शुभारंभ आज आयोजित केला होता. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रदीपकुमार डांगे, सहाय्यक जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज, निवासी उपजिल्हाधिकारी अशोक लटारे व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दिपक लिमसे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.जिल्हाधिकारी यांनी ध्वजनिधी देवून ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ केला. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, मागील वर्षी ध्वजनिधीचे १०० टक्के पूर्ण केले आहे. यावर्षी सुध्दा उद्दिष्टय पूर्ण करण्यात येईल. सैनिकांप्रती केवळ सदभावना न ठेवता जास्तीत जास्त ध्वजनिधी एकत्रित करुन कृतीच्या माध्यमातून आपली सैनिकांप्रती भावना व्यक्त करणे गरजेचे आहे. भंडारा येथे सैनिक कॅन्टीनचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. सैनिकांच्या कुटूंबियांच्या प्रश्नांची व समस्यांचे विभागनिहाय वर्गीकरण करुन सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी द्यावे, हे सगळे प्रश्न तातडीने सोडविले जातील.जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू म्हणाल्या की, ध्वजदिन निधी हा सैनिकांच्या कल्याणासाठी वापरला जातो. या निमित्ताने आपणासर्वांना चागली संधी असून सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजनिधी मोठया प्रमाणात गोळा केला जावा. यामुळे सैनिकांच्या बलिदानाची कर्तव्यातून जाणीव ठेवली असा संदेश समाजात जाईल. कार्यक्रमात उपस्थितांच्या हस्ते विरमाता, विरपत्नी यांचा गौरव करण्यात आला. यात विरपत्नी उर्मिला तितरमारे, विरमाता सिताबाई माटे, जनाबाई मडामे व विमलबाई बनसोड यांचा समावेश आहे. सैनिकांच्या गुणवंत पाल्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात प्रियंका गायधने व परितोष बटराखाये यांचा समावेश आहे. सैनिकांच्या व्यवसाय शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना आर्थिक मदत यावेळी करण्यात आली. सुखदेव शेंडे, गिरधारी थोटे, अशोक गभणे, श्रीकृष्ण देवाडे, अशोक डोंगरवार, रविंद्र गायधनी, एस.बी. शहारे व ओम बहादूर सिंग यांना धनादेश देवून प्रोत्साहित करण्यात आले. ध्वजनिधी संकलनात उद्दिष्टय पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र व भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक कॅप्टन दीपक लिमसे यांनी केले. गेल्या वर्षी २४ लाखाचे उद्दिष्टय होते. ते पूर्ण केल्याचे लिमसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)