बेला येथील प्रकार : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रीय महामार्गावरील बेला येथे भंडारा शहरातील एक महिला मागील काही दिवसांपासून देह व्यवसाय करीत होती. याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून दोन महिलेसह एका तरुणाला अटक केली. रणजित गजभिये (३०) रा.वरठी असे अटकेत असलेल्या तरुणाचे नाव असून देह व्यवसाय चालविणारी ४५ वर्षीय महिला ही भंडारा शहरातील रहिवासी आहे. तर देहविक्री करणारी ३० वर्षीय महिला ही नागपूर येथील असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांनी केली.बेला येथील सुभाष वॉर्डात मागील काही दिवसांपासून भंडारा शहरातील ही महिला देहविक्रीचा व्यवसाय करीत होती. या व्यवसायातून ती नागपूर, भंडारा व अन्य ठिकाणच्या युवती व महिलांना या व्यवसायात आर्थिक प्रलोभन नेऊन बोलावित होती. या व्यवसायाची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यांनी सुभाष वॉर्डात सापळा रचला. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने देह व्यापार करणाऱ्या घरी तरुण व महिलेने प्रवेश केल्यानंतर छापा घातला. या कारवाईत वरठी येथील रणजित गजभिये, नागपूर येथून आलेली महिला व व्यापार करणारी महिला अशा तिघांना ताब्यात घेतले. या तिघांविरुद्ध भंडारा पोलीस स्टेशन येथे स्त्रीयांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस अधीक्षक प्रणती लांजेवार, पोहवा सुधीर मडामे, पोलीस नाईक रोषण गजभिये, मोहरकर, बबन अतकरी, पोलीस शिपाई कौशीक गजभिये, चेतन पोटे, रमाकांत बोंदरे, स्नेहल गजभिये, योगीता जांगळे, चालक रामटेके यांच्या पथकाने केली.
देहव्यापार अड्ड्यावर छापा
By admin | Updated: June 14, 2017 00:14 IST