पवनी : शासनाच्या बदलणाऱ्या धोरणामुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील समस्या वाढत आहेत. समस्यांना सामोरे जावून त्या सोडविण्यासाठी मुख्याध्यापकांनी संघटीतपणे कार्य करावे असे आवाहन प्राचार्य होमराज कापगते यांनी केले.तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे संत तुकाराम हायस्कुल ब्रम्ही येथे आयोजित सेवानिृवत्त मुख्याध्यापक व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते. समारंभाचे अध्यक्ष माजी मंडळ सदस्य प्राचार्य होमराज कापगते, प्रमुख अतिथी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचायर राजकुमार बालपांडे, सचिव जी.एन. टिचकुले, राज्य मुख्याध्यापक संघाचे सदस्य अशोक पारधी, विदर्भ प्रतिनिधी प्राचार्य रेखा भेंडारकर, संयोजक मुख्याध्यापक सुरेश खोब्रागडे, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ए.ए. भोयर, सचिव व्ही.एस. जगनाडे उपस्थित होते.विद्या कृषी विकास हायस्कुल भुयारचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक शाम घुमे, सुजाता कन्या विद्यालय अड्याळचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाहाणे यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थिनी प्रमोदिनी लोखंडे हिचा स्मृतीचिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला. प्राचार्य बालपांडे, प्राचार्य टिचकुले व अशोक पारधी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. सत्कारमूर्ती विद्यार्थिनीने डॉक्टर बनून जिल्हाधिकारी होण्याचे ध्येय ठरविले असल्याचे मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक ए.ए. भोयर, अतिथींचा परिचय व स्वागतपर भाषण सुरेश खोब्रागडे यांनी तर सांचलन स.शि.जी.आर. थोटे व आभार मुख्याध्यापक लुटे यांनी मानले. याप्रसंगी मुख्याध्यापक बी.पी. चांदेवार, युसुफ बेग, उधाडे, शाम घुमे, वाहाणे उपस्थित होते. संत तुकाराम हायस्कुल ब्रम्हीच्या विद्यार्थिनींनी समूहनृत्य सादर केले. कार्यक्रमाचे यशस्वीसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. (तालुका प्रतिनिधी)
मुख्याध्यापकांनी संघटीतपणे कार्य करणे गरजेचे
By admin | Updated: December 10, 2014 22:53 IST