शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

कवडसी ग्रामपंचायतचा देशपातळीवर गौरव

By admin | Updated: May 15, 2017 00:38 IST

भंडारा तालुक्यातील कवडसी ग्रामपंचायतीने केलेल्या कामाचा व शासकीय योजनांचा ग्रामस्थांना दिलेल्या लाभाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे.

राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान : भंडारा पंचायत समितीच्या सन्मानात मानाचा तुरालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा तालुक्यातील कवडसी ग्रामपंचायतीने केलेल्या कामाचा व शासकीय योजनांचा ग्रामस्थांना दिलेल्या लाभाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. कवडसी ग्रामपंचायतीला २०१५-१६ च्या दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.स्मृतीचिन्ह व आठ लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. लखनौ येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती सभागृहात पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय मंत्री (पंचायत राज) नरेंद्रसिंह तोमर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सरपंच रंजना बाभरे, सचिव कांचन कुंभारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.या ग्रामपंचायतने तत्कालीन सरपंच व विद्यमान जि. प. सदस्य प्रेम वनवे यांच्या कार्यकाळात शासकीय योजनांची अंमलबजावणी करून गाव विकास साधला. यासोबतच गावाला हागणदारीमुक्त गाव, ग्रामस्वच्छता अभियान, दलितवस्ती पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्रदान केले आहे. या पुरस्कारासाठी कवडसीचे कार्य उल्लेखनीय आहे. या पुरस्काराकरिता उपसरपंच शामराव राऊत, सदस्य प्रकाश घोल्लर, सदस्य रामसागर शामकुवर, अर्जना घोल्लर, अनुराधा घोल्लर, रोशनी कारेमोरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह मुख्याध्यापक दिलीप कुकडे, रविंद्र फंदे, अंताराम खराबे, शा.व्यं.स. अध्यक्ष, लिल्हारे, बानाईत, ग्रा.पं. चे संजय बाभरे व देवानंद बांगर, विष्णू शामकुवर, कर्मचारी यांच्यासह कवडसी येथील सर्व ग्रामस्थांचे योगदान लाभले. कवडसीला मिळालेल्या पुरस्काराने भंडारा पंचायत समितीचा सन्मान वाढला आहे.या पुरस्कारामुळे कवडसी गावाचे नाव देशपातळीवर गौरविण्यात आले, ही अतिशय अभिमानाची बाब आहे. तसेच एकोप्याने शासकीय योजनांची अंमलबजावणी करून ग्रामस्थांना शासकीय योजनांचा लाभ दिला. यामुळे नागरिकांचे जिवनमान उंचावण्यास मदत होईल.- प्रेम वनवे, जि.प. सदस्य, भंडारा.या पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली आहे. यासाठी सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावाचा विकास करण्यासाठी कटीबद्ध आहे.- रंजना बाभरे, सरपंच