शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकाने सिहोराचे पोलीस निरीक्षक सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 23:40 IST

सिहोरा पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले मनोहर कोरोटी यांना सहपत्नीक मुंबईत पार पडलेल्या आयोजित कार्यक्रमात राज्यपाल विद्यासागर राव यांचे हस्ते राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देकोरोटी यांचा सत्कार: नक्षल मोहिमेतील कामगिरीची दखल

लोकमत न्यूज नेटवर्कसिहोरा : सिहोरा पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले मनोहर कोरोटी यांना सहपत्नीक मुंबईत पार पडलेल्या आयोजित कार्यक्रमात राज्यपाल विद्यासागर राव यांचे हस्ते राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले. यावेळी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर उपस्थित होते.गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी केंद्र शासनाने संयुक्त अभियान राबविले होते. या अभियानात छत्तीसगढ आणि महाराष्ट्राचे विशेष पोलीस कृती दलाचे पथक कार्यरत होते. महाराष्ट्र कृती दलाची जबाबदारी मनोहर कोरोटी यांचेकडे होती. सन २०१४ मध्ये या अभियानाची सुरूवात करित असताना विजापूर गावाचे हद्दीत नदी पात्रात नक्षलवाद्यांनी कृती दलाचे पथकावर गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला कृती दलाच्या पथकाने प्रतीउत्तर दिले. पोलीस पथकाने गोळीबार केल्याने अनेक नक्षलवादी जंगलात पळून गेले. या चकमकीत कमांडर ठार झाला. यात अन्य दोन पुरूष नक्षलवादी व महिला नक्षलवाद्यांना ठार करण्यात कृती दलाचे पथकाला यश आले. या वर्षात नक्षलवादी विरोधात ही मोठी कारवाई ठरली होती. मृत नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलीस पथकाने ताब्यात घेतले. नक्षलवाद्यांना ठार करण्यास पथकाने शौर्य गाठल्याने २६ जानेवारी २०१६ ला मनोहर कोरोटी यांना राष्ट्रपती शौर्य पदक घोषित झाले. राज्यपाल विद्यासागर राव यांचे हस्ते पोलीस निरीक्षक मनोहर कोरोटी व त्यांची पत्नी रिना कोरोटी यांना सहपत्नीक राष्ट्रपती पोलीस शौर्य पथकाने सन्मानित करण्यात आले.