आॅनलाईन लोकमतभंडारा : वृत्त लिहितांना पत्रकारांचे सादरीकरण (प्रेझेंटेशन) प्रभावी असावे, त्यामुळे वाचकांवर त्यांचा अमिट ठसा उमटत असतो. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरा करताना माहिती अधिकारी रवी गीते यांनी आपल्या भाषणातून विषद केले.भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे वतीने पत्रकार भवनात पत्रकार दिनाचे कार्यक्रम आयोजित केले होते. जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते म्हणाले की, पत्रकारिता स्वातंत्र्यपूर्वी आणि स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर पत्रकारीतेचा दृष्टिकोन बदलत गेलेला आहे. याशिवाय २००१ नंतरची पत्रकारिता एकदम बदलली असून पत्रकारिता शुध्द स्वरुपात राहीली नसून त्यात व्यवसायीकरण निर्माण झाले आहे. प्रिंट मिडीया, इलेक्ट्रानिक मिडीया आणि सोशल मिडीयांनी शिरकाव केलेला आहे. त्यामुळे विश्वासहार्यता राहिलेली नाही. काळानुसार पत्रकारीचे स्वरुप बदलले दिसत आहे. खऱ्या अर्थाने यात सेवाभाव दिसत नाही.अध्यक्षस्थानी रवी गीते होते. मंचावर सचिव मिलिंद हळवे, उपाध्यक्ष राकेश चेटूले उपस्थित उपस्थित होते. संचालन कोषाध्यक्ष डी.एफ.कोचे यांनी केले असून आभारप्रदर्शन सहसचिव काशीनाथ ढोमणे यांनी सांभाळले.याप्रसंगी पत्रकार चंद्रकांत श्रीकोंडावार, कविता नागपूरे, विलास सुदामे, विजय क्षिरसागर, हिवराज उके, सुरेश कोडगले, नितीन कारेमोरे, सुरेश फुलसुंगे, प्रमोद भांडारकर, राजू आगलावे, अजयकुमार राव, ललीतसिंह बाच्छिल, विश्वकांत भुजाडे, जयकृष्ण बावनकुळे, उमेश मोहतुरे आदी पत्रकार आणि जिल्हा माहिती अधिकारी येथील कर्मचारी विजय डेहनकर, घनशाम खडसे, तथा पृथ्वीराज बन्सोड प्रामुख्याने उपस्थित राहून सहकार्य केले.
पत्रकारांचे सादरीकरण प्रभावी असावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:59 IST
वृत्त लिहितांना पत्रकारांचे सादरीकरण (प्रेझेंटेशन) प्रभावी असावे, त्यामुळे वाचकांवर त्यांचा अमिट ठसा उमटत असतो.
पत्रकारांचे सादरीकरण प्रभावी असावे
ठळक मुद्देरवी गीते यांचे प्रतिपादन : मराठी पत्रकार संघात पत्रकार दिवस साजरा