शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

देशपातळीवरील खेळाडू तयार व्हावे

By admin | Updated: January 31, 2016 00:34 IST

भंडारा अनेक क्षेत्रात अग्रेसर आहे. याच मातीतून देशपातळीवरील खेळाडू तयार व्हावेत, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे यांनी व्यक्त केले.

नगराध्यक्ष चषकाचे उद्घाटन : नाना पंचबुद्धे यांचे प्रतिपादनभंडारा : भंडारा अनेक क्षेत्रात अग्रेसर आहे. याच मातीतून देशपातळीवरील खेळाडू तयार व्हावेत, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे यांनी व्यक्त केले.नगरपरिषद भंडारा व तरुणाई सेवा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर डॉ. प्रकाश मालगावे, जुगल भोंगाडे, सुनिल मेंढे, विनयमोहन पशिने, भगवान बावनकर, निलू अवघाते, हिवराज उके, रुपेश टांगले उपस्थित होते.यावेळी डॉ. प्रकाश मालगावे यांनी, बौद्धिक क्षमता व शारीरिक क्षमता या दोन्ही आवश्यक आहेत. मानवाच्या सर्वांगिण विकासाकरिता खेळ महत्वाचे आहे. उद्घाटनप्रसंगी गुणवंत खेळाडूंचे सत्कार करण्यात आले. यात प्रामुख्याने चौथ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या व अनेक खेळात प्राविण्य मिळविणाऱ्या विकास मारोती खराबे यांचा सत्कार करण्यात आला. शालेय मॉन्टेक्स बॉल स्पर्धेकरिता राज्यस्तरीय कामगिरी केल्याबद्दल आकांक्षा साठवणे, राष्ट्रीय खेळाडू ज्योत्स्ना बानासुरे, तैराकी मध्ये प्राविण्य प्राप्त करणारी सिद्धी मदनकर हीचा सत्कार करण्यात आला. कबड्डीमध्ये घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करून आॅल इंडिया युनिव्हर्सीटी मध्ये कलर कोड प्राप्त करणाऱ्या सिरसम यांचा समावेश आहे. सदर टेनिक बॉल क्रिकेट स्पर्धा ३० जानेवारी ते ७ फेब्रुवारीपर्यंत रेल्वे ग्राऊंड, माधव नगर खात रोड येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये मध्यप्रदेश, महाराष्ट्र व छत्तीसगड खेळाडू राहणार आहेत. प्रामुख्याने छिंदवाडा, परासिया, भिलाई, बिलासपूर, गोंदिया, देवरी, नागपूर, रामटेक, उमरेड, पौनी, तुमसर, साकोली, लाखनी, भंडारा येथील चमूंनी भाग घेतला आहे. प्रास्ताविक व संचालन महेंद्र निंबार्ते यांनी केले. यावेळी गणेश खोडे, उमेश काकडे, अन्वेष मेंढे, अमित गोन्नाडे, सचिन बांते, रुपेश सोनवाने उपस्थित होते. आभार ललीत भोयर यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)