शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

स्पर्धा परीक्षांची तयारी तरुणांच्या खिशात

By admin | Updated: April 18, 2015 00:20 IST

आजचा तरुण हा टेक्नोसॅव्ही असून मोबाईल क्रांतीच्या युगाचा तो साक्षीदार आहे. सारे काही एका मोबाईलमध्ये त्याला मिळत आहे.

प्ले-स्टोअरवर तब्बल २५० अ‍ॅप्स : मोबाईलची दुनिया; पुस्तके घेण्यापेक्षा नव्या अ‍ॅप्सवर अभ्यास करण्याकडे कलभंडारा : आजचा तरुण हा टेक्नोसॅव्ही असून मोबाईल क्रांतीच्या युगाचा तो साक्षीदार आहे. सारे काही एका मोबाईलमध्ये त्याला मिळत आहे. याचाच प्रत्यय स्पर्धा परीक्षांची तयारी करतानाही येत आहे. स्पर्धा परीक्षार्थी संपूर्ण तयारी अ‍ॅप्सच्या माध्यमातून करून घेत आहे. गूगल प्ले स्टोअरवर स्पर्धा परीक्षांची तयारी करवून घेणारे तसेच परीक्षांची माहिती देणारे तब्बल २५० हून अधिक अ‍ॅप्स मोफत स्वरूपात उपलब्ध आहेत. नोकरी हा प्रत्येक तरुण-तरुणीसाठी कळीचा प्रश्न बनला आहे. खूप शिकूनही नोकरी मिळेलच, याचा नेम नाही. त्यामुळे अनेक जण बारावीनंतरच सरळ एमपीएससी, युपीएससी, बँकिंग आणि इतरही स्पर्धा परीक्षांचा आव्हानात्मक मार्ग स्वीकारुन स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी स्पर्धा परीक्षांवर मार्गदर्शन करणाऱ्या सर्वोत्तम परीक्षा केंद्रात शिकवणी लावण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी विविध विषयांची पुस्तके खरेदी करीत आहे. ही सर्व आॅफलाईन धडपड सुरू असताना आॅनलाईन जगात वावरणारी युवा पिढी त्यापासून नामानिराळी राहिली तर नवलच. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना इंटरनेटची गरज महत्त्वाची झाली आहे. कुठलिही नवी माहिती मिळविण्याचा तो महत्त्वाचा पर्याय आहे. यासाठी काही वर्षांपूर्वी संगणकावर नेटचा वापर केला जात असे. मागील दोन वर्षात स्मार्टफोनने इंटरनेट प्रत्येकाच्या खिशात आले आहे. त्यातच गूगल प्ले स्टोअरने स्पर्धा परीक्षांची माहिती असणारी, तयारी करून घेणारी, ज्ञानात भर घालणारी २५० अ‍ॅप्स आहे. या माध्यमातून तरुणांनाही एमपीएससी, यूपीएससी, एसएससी, आयबीपीएस, बँकिंगची माहिती मिळत असल्यामुळे त्याचा वापर वाढला आहे. (नगर प्रतिनिधी)परीक्षांची माहिती देणारे अ‍ॅप्स प्ले स्टोअरवर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हे दोन शब्द टाकताच अ‍ॅप्सचा खजिना समोर येतो. परीक्षांची तयारी करताना सर्वप्रथम कुठली परीक्षा या काही दिवसात आहे हे जाणून घेण्यावर युवकांचा भर असतो. आधी ही माहिती स्पर्धा परीक्षा साहित्याची विक्री करीत असलेल्या दुकानांमध्ये, वृत्तपत्रे व काही संकेतस्थळावरून मिळत होती. आता ती माहिती देणारी एमपीएससी अलर्ट, नौकारी अलर्ट, सरकारी नोकरी अशी अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. ती मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यास आगामी परीक्षांसंदर्भात सविस्तर माहिती मिळत असते. त्यामुळे अशा अ‍ॅप्सला स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे सर्वाधिक पसंती देत आहेत. बँक परीक्षांची पुरेपूर तयारीआयबीपीएसद्वारे राष्ट्रीयकृत बँकांची परीक्षा एकत्र घेणे सुरू झाले आहे. त्यामुळे एकगठ्ठा बँकेच्या जागा निघत असतात. तसेच बँकेची नोकरी सुखाची, असा समज युवावर्गात असल्यामुळे बँकांच्या परीक्षा देण्यावर सर्वाधिक भर असतो. त्यामुळे गूगल प्ले स्टोअरवर बँकर अड्डा, आयबीपीएस एक्झाम, बँक एक्झाम प्रॅक्टिस अशी अनेक अ‍ॅप्स उपलब्ध असून ती परीक्षार्थीसाठी फायद्याची ठरत आहेत. मुलाखतीची तयारीनोकरी मिळण्याची सर्वात शेवटची पायरी म्हणजे मुलाखत. यासाठी स्पर्धकाने स्वत: खूप सजग असणे आवश्यक असते. यासाठी भरपूर वाचन गरजेचे असते. असे असले तरी मुलाखतीची तांत्रिक माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी मुलाखतीची माहिती देणारे बहुसंख्य अ‍ॅप्स फायदेशीर ठरत आहेत. आॅनलाईन परीक्षाप्ले-टोअरवर प्रश्नपत्रिका सोडविण्याची सोय असलेली टेस्ट सिरिज स्वरूपातील अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. त्याठिकाणी त्वरित बरोबर उत्तरे मिळण्यासोबत प्रश्नोत्तरे संग्रही ठेवण्याची सुविधाही उपलब्ध आहे.