शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

By admin | Updated: January 11, 2017 00:22 IST

घराशेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्य जाळ्यात ओढून तिचे शारीरिक शोषण केले.

पवनी येथील घटना : आरोपी तरूणाला अटक भंडारा : घराशेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्य जाळ्यात ओढून तिचे शारीरिक शोषण केले. यात ती गर्भवती राहिल्यामुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पवनी पोलिसांनी आरोपी तरूणाला अटक केली असून प्रकरणामुळे पवनी तालुक्यात खळबळ उडाली आहे.पवनी येथून जवळच असलेल्या पवना (खु.) गावातील हा संतापजनक प्रकार आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून पवनी पोलिसांनी प्रदीप दिघोरे (२३) याला अटक केली आहे. पवना येथील पीडित मुलगी ही १६ वर्षे वयाची आहे. आरोपी तरूण हा त्याच गावातील रहिवासी असून पीडितेच्या घराशेजारी राहतो. पीडित मुलगी ही नववीपर्यंत शिकलेली आहे. तर हा तरूण मजुरीचे काम करीत असल्याचे पवनी पोलिसांनी सांगितले.पीडित मुलगी व तरूण हे दोघेही एकाच समाजाचे असून घराशेजारी राहतात. दीड वर्षापूर्वी त्यांचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर या तरूणाने लग्न करण्याचे आमिषे देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यात ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर या मुलीने या तरूणाला याबाबत सांगितले. त्यानंतर त्याने ‘तो मी नव्हेच’ची भूमिका घेतली. मुलीने सदर बाब कुटुंबीयांना सांगितल्यानंतर सोमवारला पवनी पोलीस ठाण्यात त्या तरूणाविरूध्द तक्रार दाखल केली. याप्रकरणी पवनी पोलिसांनी प्रदीप दिघोरेविरूध्द भादंवि ३७६ (२), (आय) (एन), सहकलम ४, ६ बाललैंगिक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली.या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुहास चौधरी करीत आहे. याप्रकरणी आरोपीला मंगळवारला न्यायालयात हजर करण्याची पोलिसांनी तयारी केली. मात्र, त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने रूग्णालयातून सुटी झाली नाही. याप्रकरणी पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असता न्यायाधीशांनी आरोपीची रूग्णालयातून सुटी झाल्यानंतर हजर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहे. (शहर प्रतिनिधी)आरोपीला हलविले नागपूरलायाप्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला पवनी त्यानंतर भंडारा जिल्हा सामान्य सामान्य रूग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अधिक खालावल्यामुळे त्याला नागपूरला हलविण्यात आले आहे. त्याला हृदयविकाराचा त्रास असल्याची माहिती तपास अधिकारी सुहास चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली.तपासणीत मुलगी गर्भवतीपीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सोमवारला पवनी येथे वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तिला जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठवून तपासणी करण्यात आली.