लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सन २०१९-२० ते २०२४-२५ पर्यंतच्या सहा वर्षात प्री मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठीभंडारा जिल्ह्याला २१ कोटी ९८ लाख ८६ हजार रुपयांचा निधी मिळणे गरजेचा होता. परंतु, प्रत्यक्षात ५ कोटी ७ लाखांचा निधी मिळाला. अद्यापही १६ कोटी ९१ लाख ८६ हजारांचा निधी मिळालेला नाही. तसेच वर्ष लोटले असताना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचा ७८.६६ लाखांचा निधीही अप्राप्त आहे. दोन्ही योजनांचा निधी मिळणार केव्हा, असा प्रश्न ओबीसी सेवा संघाच्या वतीने विचारला जात आहे.
राज्यात सावित्रीबाई फुले मुलींच्या शिष्यवृत्ती अंतर्गत वर्ग ५वी ते ७वीपर्यंतच्या प्रत्येक मुलीला २५०० रुपये, तर वर्ग ८वी ते १०वीपर्यतच्या प्रत्येक मुलीला तीन हजारांचे अनुदान राज्य शासनाकडून दिले जाते. सन २०२४-२५ या वर्षात सावित्रीबाई फुले मुलींच्या शिष्यवृत्ती अंतर्गत दोन कोटी २८ लाखांचे अनुदान मिळणे गरजेचे होते.
ओबीसी वसतिगृहात सोयी-सुविधांचा अभावओबीसी आंदोलनांची दखल घेत दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने राज्यात ७२ वसतिगृहांना मंजुरी दिली. जिल्ह्यात दोन वसतिगृह सुरू करण्यात आले. परंतु, अनेक जिल्ह्यात अद्यापही वसतिगृह सुरू झालेली नाहीत. जिल्ह्यातील वसतिगृहासाठी स्वतःची इमारत नाही, तसेच अन्य सोयी-सुविधांचा अभाव आहे.
ओबीसींसाठी आडबले यांनी घ्यावा पुढाकारओबीसींच्या विविध समस्यांना सभागृहात वाचा फोडण्यासाठी आ. सुधाकर आडबले यांनी पुढाकार घ्यावा, यासाठी ओबीसी सेवा संघाच्या वतीने आ. सुधाकर आडबले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर, सरचिटणीस संजीव बोरकर, कार्याध्यक्ष ईश्वर निकुळे, कोषाध्यक्ष रमेश शहारे. शभदा झंझाड, लता बोरकर, श्रीकृष्ण पडोळे, अरुण जगनाडे, गोपाल देशमुख, राजू वंजारी, प्रा. मार्कड गायधने, तुळशीराम बोंदरे, पंजाबराव कारेमोरे उपस्थित होते.