शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नशीब बलवत्तर म्हणून वाचले प्राण

By admin | Updated: January 18, 2017 00:20 IST

मकरसंक्रांतीनिमित्त पतंग मोठ्या प्रमाणात उडविण्यात येते. यासाठी चायना मांजावर बंदी असतानाही शहरात त्याची विक्री होत आहे.

चायना मांजा : मोठा बाजार परिसरातील घटनाभंडारा : मकरसंक्रांतीनिमित्त पतंग मोठ्या प्रमाणात उडविण्यात येते. यासाठी चायना मांजावर बंदी असतानाही शहरात त्याची विक्री होत आहे. या मांजामुळे एका शिक्षकाचे नशिब बलवत्तर असल्याने प्राण वाचले. हा प्रकार शहरातील मोठा बाजार परिसरात घडला.शहरातील संत कबीर वॉर्डातील राजेश कृष्णराव निंबार्ते हे खरबी येथील विकास हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. सोमवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्यांच्या दुचाकीने भावाच्या लहान मुलाला शाळेत सोडून देण्यासाठी निघाले होते. दरम्यान सकाळच्या सुमारास पतंग उडविण्याचा प्रकार सुरू होता. चायना मांजावर शासनाने बंदी घातलेली असतानाही या मांजाच्या सहायाने पतंग उडविल्या जात होते. दरम्यान मोठा बाजार परिसरातून जात असताना अचानक त्यांच्या मानेला या मांजाने स्पर्श केला. मानेला काहीतरी लागल्याचा भास झाल्याने त्यांनी डाव्या हाताच्या आंगठ्याने तो काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या अंगठ्याला व गळ्याला मांजामुळे इजा झाली. समयसुचकतेने त्यांनी वाहन थांबविले व बघितले असता चायना मांजाने त्यांच्या गळ्याला इजा झाल्याने रक्त निघाले. दरम्यान त्यांनी तातडीने डॉक्टरकडे जावून प्रथमोपचार केले.शासनाच्या वतीने चायना मांजावर बंदी घातली असतानाही शहरात त्याची विक्री होत असल्याचे यावरून सिद्ध होते. राजेश यांचे नशिब बलवत्तर असल्यानेच मोठी दुर्घटना टळली. मात्र अशा मांजा व्रिकेत्यांवर प्रशासन व पोलीस विभागाने कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. (शहर प्रतिनिधी)