शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी घोडदौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 22:22 IST

पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक भाजप आणि काँग्रेसने प्रतिष्ठेची केली होती.

ठळक मुद्देजि.प. अध्यक्षपद निवडणूक : काँग्रेस, भाजप, राकाँचे सदस्य भ्रमंतीवर

आॅनलाईन लोकमतभंडारा : पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक भाजप आणि काँग्रेसने प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत भाजप व काँग्रेसला अपेक्षित यश मिळाल्यानंतर आता सोमवारला होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपद निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपचे सदस्य भ्रमंतीवर असून काँग्रेसचे सदस्य मात्र दोन गटात विखुरले आहेत. या सर्व घडामोडीवर भाजप बारकाईने लक्ष ठेऊन आहे.अडीच वर्षापूर्वी जिल्हा परिषदेत काँग्रेस -राष्ट्रवादीने आघाडी करून सत्ता स्थापन केली होती. यावेळी या सत्तांतर करण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या होत्या. परंतु नाना पटोले यांनी खासदारपदाचा राजीनामा दिल्यानंतर जिल्ह्यातील समिकरणे बदलत असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.५२ सदस्यीय जिल्हा परिषदेत अडीच वर्षापूर्वी समसमान जागांचे वाटप करून आघाडी केली होती. तशीच आघाडी सोमवारला होण्याची शक्यता आहे. परंतु आताच्या अडीच वर्षाच्या कालावधीत अध्यक्षपद सव्वा-सव्वा वर्षे असे विभागून देण्यात यावे, असे मत माजी आमदार सेवक वाघाये यांनी व्यक्त केले आहे. तर यावेळी अध्यक्ष हा पुरूष असावा असे पक्षश्रेष्ठीला वाटत असल्यामुळे यावर रविवारला नागपुरात बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. असे असले तरी जिल्हा परिषदेत कुणाची सत्ता बसणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.काँग्रेस दोन गटात तरीही एकत्रचएक दिवसावर आलेल्या या निवडणुकीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपचे सदस्य सद्यस्थितीत भ्रमंतीवर आहेत. परंतु काँग्रेसचे दोन गट वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. काँग्रेसच्या एका गटात ११ सदस्य तर दुसºया गटात आठ पक्षीय सदस्यांसह तीन अपक्ष सदस्य आहेत. काँग्रेसचे १९ सदस्य असताना हे संख्याबळ आता २२ झाले आहे. हे दोन्ही गट भ्रमंती करून सध्या विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. या दोन्ही गटाच्या नेत्यांच्या रविवारला भेटीगाठीनंतर अध्यक्षपदाचा उमेदवार आणि सभापतीपद यावर एकमत करतील आणि सर्व मिळून सोमवारला मतदानासाठी येणार आहेत.भाजपच्या गटात दोन सदस्य अनुपस्थितजिल्हा परिषदेत भाजपचे १३ सदस्य आहेत. भाजपचे सदस्यही भ्रमंतीवर गेले असून त्यात दोन सदस्य अनुपस्थित आहेत. त्यात नाना पटोले यांचे विश्वासू मानले जाणाऱ्या दोघांचा समावेश असण्याची शक्यता आहे. हे दोन्ही सदस्य काँग्रेसच्या बाजुने राहण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीचे संख्याबळ दोनने वाढलेजिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे १५ सदस्य आहेत. हे सर्व सदस्य शनिवारला भ्रमंतीसाठी निघाले असून त्यांच्यासोबत एक अपक्ष सदस्य आणि एक शिवसेनेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांचे संख्याबळ दोनने वाढून १७ झाले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केली तर एकूण संख्याबळ २२ अधिक १७ अशी ३९ ईतकी होते.