शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सरपंचांमध्ये गावाचा चेहरा बदलविण्याची ताकद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:29 IST

सरपंचांना शासनाच्या मदतीने गावांमध्ये परिवर्तन घडविण्याची मोठी संधी आहे. मनात आणले तर लोक जीवनभर लक्षात ठेवतील.

ठळक मुद्देबाळा काशिवार : लाखांदूर येथे ग्रा.पं.सदस्यांचा सत्कार

आॅनलाईन लोकमतलाखांदूर : सरपंचांना शासनाच्या मदतीने गावांमध्ये परिवर्तन घडविण्याची मोठी संधी आहे. मनात आणले तर लोक जीवनभर लक्षात ठेवतील. विकासाची एकत्रित संकल्पना राबवा. तुम्ही खरे जनतेचे प्रतिनिधी, दुवा आहात. परिवर्तनाचे दूत म्हणून या सत्कार समारंभातून परत जा आणि शेतकरी व सामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी कटीबद्ध व्हा, परिवर्तन घडवा, असे आवाहन आमदार बाळा काशिवार यांनी केले.लाखांदूर येथे भाजपच्यावतीने आयोजित नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ व भाजपा कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष तारीक कुरेशी होते, सत्कारमूर्ती म्हणुन विधान परीषद सदस्य डॉ.परीणय फुके होते. विशेष अतिथी म्हणून जिल्हा महामंत्री मुकेश थानथराटे, प्रशांत खोब्रागडे, जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी, माधुरी हुकरे, दीपक मेंढे, राजेश बांते, वामनराव बेदरे, माजी सभापती गीता कापगते, रेखा भाजीपाले, इंद्रायणी कापगते, नगराध्यक्षा निलम हुमने, साकोलीच्या नगराध्यक्षा धनवंता राऊत, शेषराव वंजारी, हरीष तलमले, राजेंद्र फुलबांधे, गोपीचंद भेंडारकर, नलिनी खरकाटे, राजु नाकतोडे, ज्योती राऊत, नरेश खरकाटे, विनोद ठाकरे, उपस्थित होते.यावेळी डॉ.परिणय फुके म्हणाले, समाजात सर्वच क्षेत्रांमध्ये चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. आपल्या कार्यातून जो समूहाचे जीवन बदलू शकतो, जीवन बदलण्यासाठी प्रेरित करून सकारात्मक दिशेने नेऊ शकतो तोच खºया अर्थाने नेता ठरतो. सरपंच गावाला उत्तम नेतृत्व देऊ शकले, तर विकासाच्या बदलाची प्रक्रिया वेगाने सुरू होईल. तसे झाले तर आपण पाच वर्षात समृद्ध होणार.कार्यक्रमाच्या प्रारंभी लाखांदूर तालुक्यातील २१७ कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ५०२ सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष नुतन कांबळे यांनी केले. संचालन प्रविन राऊत यांनी तर आभारप्रदर्शन तुकाराम भेंडारकर यांनी केले. कार्यक्रमासाठी राजेश महावाडे, ओम करंजेकर, रमेश दोनोडे, हरीष बगमारे, भारत मेहंदळे, राहुल कोटरंगे, विजय खरकाटे, भुषण चिञिव, यश खत्री, रजत गौरकर, योगेश ब्राह्मणकर, गिरीष भागडकर, तुलसीदास बुरडे, राहुल राऊत, रूपेश काळबांधे, लोमेश देशमुख, आनंद देशपांडे यांच्यासह तालुका आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.