आश्वासन : पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थितीतुमसर : चौकशी अहवाल सादर करूनही प्रभारी मुख्याध्यापकावर प्रशासकीय कारवाईत दप्तरदिरंगाई विरोधात तुमसर पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी आज रास्तारोको आंदोलनाचा इशारा दिला होता. आज तुमसर येथे दुपारी भंडारा जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. अहिरे यांनी पदाधिकाऱ्यांना कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा परसवाडा (सि) येथील पदवीधर शिक्षक तथा प्रभारी मुख्याध्यापक ए. एस. हलमारे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याबाबत १३ फेब्रुवारी रोजी तक्रार करण्यात आली होती. तुमसर पंचायत समितीचे गटनेता हिरालाल नागपुरे यांनी ही तक्रार दिली होती. पंचायत समितीच्या मासीक सभेत त्यावर चर्चा होवून ठराव घेण्यात आला. त्या अनुषंगाने गट शिक्षणाधिकारी सी.के. नंदनवार यांना चौकशी करून अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला सादर केला.अहवालात प्रभारी मुख्याध्यापक ए.एस. हलमारे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली. परंतु प्रशासकीय कारवी करण्यास जिल्हा परिषद प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप हिरालाल नागपुरे यांनी केला. नागपूरे यांनी प्रत्यक्ष दोनदा जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेटी घेऊन चर्चा केली. परंतु प्रतिसाद मिळाला नाही.२८ फेब्रुवारीला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा पंचायत समिती सभापती कविता बनकर, उपसभापती शेखर कोतपल्लीवार, गटनेते हिरलाल नागपुरे, पं.स. सदस्य अशोक बन्सोड, अरविंद राऊत, मुन्ना पुंडे, मंगला कनपटे यांनी दिला होता. त्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली. मंगळवारी दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. अहिरे यांनी तुमसर पंचायत समितीला भेट देऊन पदाधिाकऱ्यांशी चर्चा केली. चर्चेनंतर अहिरे यांनी रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. कारवाईचे आश्वासनानंतर पं.स. पदाधिकाऱ्यांनी आंदोलन तुर्त स्थगित केले. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू बनकरसह पदाधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
आंदोलन स्थगित
By admin | Updated: March 1, 2017 00:31 IST