शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नहर रस्त्यावर खड्डेच खड्डे अपघाताची शक्यता

By admin | Updated: October 25, 2014 22:36 IST

पेंच प्रकल्प अंतर्गत असलेल्या मोहाडी तालुक्यातील सर्व प्रकारच्या नहर रस्त्यावर मुरुम टाकून नहर, रस्ते रहदारीस सुव्यवस्थित करावे, अशी मागणी रामटेक पाणीपुरवठा व्यवस्थापन समितीचे

पांढराबोडी : पेंच प्रकल्प अंतर्गत असलेल्या मोहाडी तालुक्यातील सर्व प्रकारच्या नहर रस्त्यावर मुरुम टाकून नहर, रस्ते रहदारीस सुव्यवस्थित करावे, अशी मागणी रामटेक पाणीपुरवठा व्यवस्थापन समितीचे संचालक विश्वनाथ कुकडे यांनी केली.मोहाडी तालुक्यातील कांद्री, जांब, हिवरा, पाजरा, घोरपड, बोंद्री, धुसाळा, खैरलांजी, नवेगा, सकरला, काटी, आंधळगाव, सालेबर्डी, वडेगाव, कान्हळगाव, हरदोली, खमारी, खुटसावरी, नेरी, सातोना, पाचगाव, बरडी, बोथली, पारडी, मोरगा, दहेगाव, वरठी, महालगाव, अकोला टोला, सकरला, पांढराबोडी, सितेपार, पिंपळगाव, मांडेसर, सिरसोली, शिवनी, चिचोली या गावपरिसरात पेंच प्रकल्पाच्या नहरांचे जाळे पसरले असून या नहर रस्त्यावरुन शेतकऱ्यांना शेतावर बैलबडी, ट्रक्टर सह ये जा करावी लागते परंतु सदर नहर रस्त्यावर मोठमोठे खोल खड्डे पडले असून हे रस्ते मातीमोल झाले आहेत. त्यामुळे या नहर रस्त्यावर शेतकऱ्यांना अवजड वाहतुक करणे त्रासदायक ठरत असुन अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. तरिपण पेंच प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे या नहर रस्त्यांच्या दुरुस्तीकडे हेतुपूरस्पर अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने याबाबत धान उत्पादक शेतकऱ्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली असून असंतोष पसरला आहे व या असंतोषाचा भडका उडण्याच्या शक्यता नाकारता येत नाही.याप्रकरणी पेंच प्रकल्पाच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून वेळीच दखल घेऊ न तसेच प्रत्यक्ष मोका पाहणी करुन नहर रस्त्यावर तत्काळ मुरुम टाकून नहर रस्ते रहदारीस सुव्यवस्थीत करावे अशी मागणी केली असून याकडे दुर्लक्ष केल्यास तिव्र जनआंदोलन करण्याचा इशारा संचालक विश्वनाथ कुकडे यांनी दिला आहे. मागील वर्षी देखील नहर दुरुस्तीसंदर्भात वरिष्ठांना तक्रारी करण्यात आल्या मात्र त्यांचा फायदा झाला नाही. यावर्षी तत्काळीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)