शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक विचाराने 'क्राईम' अत्यल्प

By admin | Updated: November 23, 2015 00:43 IST

जनतेशी सुसंवाद साधून वर्दीचा धाक न दाखवता मैत्रीपूर्ण व्यवहाराने नाती घट्ट तयार होतात. मनुष्य संस्काराने घडत असतो.

पोलीस पाटलांची सभा: १४ महिन्यात केवळ २४ गुन्ह्यांची नोंदपालांदूर /चौ. : जनतेशी सुसंवाद साधून वर्दीचा धाक न दाखवता मैत्रीपूर्ण व्यवहाराने नाती घट्ट तयार होतात. मनुष्य संस्काराने घडत असतो. त्याला संस्कार समाजात मिळाल्यास वाईट मार्गाला जाणार नाही. यातूनच एकनिष्ठ, निर्लोभ, सुसंस्कारी समाजाची निर्मिती होऊन पोलीस विभागाचा ताण कमी होतो. सट्टा, मटका, दारु आदी गुन्ह्यांची मूळ असल्याने प्रत्येकांनी यातून मोकळे राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावे, असे आवाहन पालांदूर ठाण्याचे ठाणेदार एच. एम. सय्यद यांनी पोलीस पाटलांचा सभेला केले.पालांदूर ठाण्याला ५४ गावांचा भार असून ३२ सहकाऱ्यांचा मदतीने सरंक्षण कार्य शांतपणे सुरु आहे. किटाळी, मुरमाडी, मांगली, तई गावातील दारु बंदी करुन गावांना शिस्तप्रिय वातावरण मिळण्यास मदत झाली. सट्टा, मटका राजरोसपणे चालवून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला गुन्हेगारीकडे नेणारी रित बंद करण्यात आली. महिन्याकाठी लाखाच्या घरात मिळणारी अवैध कमाईला झुगारुन पूर्णपणे सट्टा, मटका बंद करण्यात आला. ५४ गावातील प्रभावशाली व्यक्तींनी ठाणेदारांच्या कार्यशैलीवर समाधान व्यक्त केले असून कर्मावर भर देणाऱ्या व्यक्तींचा नेमीच जय होतो हे तंटामुक्त समिती, पोलीस पाटील,महिला सुरक्षा समिती यांच्याशी नियमित संवाद साधून गावातील समस्यांशी चर्चा व्हावी. आपसात असलेले हेवेदावे मोठ्यांच्या पुढाकाराने शांतपणाने सोडविल्यास गुन्ह्याचे प्रमाण कमी होते, राजकारण्यांनी पक्षभेद विसरुन नि:पक्षपणे समाजाला दिशा दिल्यास रामराज्य शक्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.जिवनात केवळ पैश्याला गरजेपेक्षा अधिक महत्व न देता कर्तव्याला श्रेष्ठत्व दिल्यास 'नर का नारायण' होण्यास वेळ लागत नाही. पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समिती, महिला सुरक्षा समिती यांच्याशी पोलीस विभागाने नियमित सलगी ठेवल्यास मोठे गुन्हे घडणारच नसल्याचे ते बोलले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या निराशेतून घडतांना दिसतात, कुटुंबात, समाजात निराशेत आढळणाऱ्या व्यक्तीकडे आपुलकीने सहानिशा करुन त्याच्या दु:खाचे वाटेकरी होत सुख प्रदान केल्यास आत्महत्येचे सत्र नक्कीच कमी होऊ शकते. समाजाला घडविण्याकरिता मोठ्या क्राईमना मुठमाती देण्याकरिता विद्यार्थी वर्गाला सजग करुन आशावादी समाजाची आशा निर्मिती होते. ठाणेदार सय्यद यांनी संताजी महाविद्यालय पालांदूर येथे अश्याच कार्यक्रमाची आखणी करुन कार्यक्षेत्रातील प्रत्येक शाळा-महाविद्यालय चर्चासत्राचे आयोजन यशस्वीपणे पार पाडले आहे. पोलीस विभागाच्या चर्चासत्राला परिसरातील पोलीस पाटील बहुसंख्येने हजर होते. कार्यक्रमाकरिता पोलीस हवालदार शेंडे, बाच्छल, नेमाडे आदीनी सहकार्य केले. (वार्ताहर)