नाना पटोले यांचे प्रतिपादन : मानेगाव (सडक) येथे कबड्डी र्स्धेचे आयोजनलाखनी : तरुणांकडून कौशल्याचा विकास करुन स्वयंरोजगाराची चळवळ उभी करण्याचे महत्त्वपूर्ण काम सुरू आहे. युवकांना नवीन दिशा आणि सकारात्मक उर्जा देण्याचे काम क्रीडा स्पर्धेतून होत असते. यासाठी तरुणाईने सज्ज राहावे, असे आवाहन भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार नाना पटोले यांनी केले. लाखनी तालुक्यातील मानेगाव (सडक) येथे जय हो क्रीडा मंडळ व नवयुवक नेहरु मंडळाच्या संयुक्त विद्यमाने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन खासदार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी लाखनीच्या नगराध्यक्ष कल्पना भिवगडे होत्या. अतिथी म्हणून नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक संजय माटे, श्रावण कापगते, हरिदास पाटील गायधनी, सरपंच अश्विनी चेटुले, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष तेजराम शेळके, सामाजिक कार्यकर्ते दलिराम कोरे, नरेंद्र भांडारकर, अशोक चेटुले, बाबा शिवणकर, पंचायत समिती सदस्य संजय डोळस, रमेश अहीरकर उपस्थित होते.माटे यांनी नेहरु युवा मंडळाच्या माध्यमातुन आयोजित क्रीडा स्पर्धातुन राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर खेळणारे खेळाडू स्पर्धेक तयार होत असल्याचे सांगितले. संचालन संदीप भांडारकर यांनी तर आभारप्रदर्शन रवींद्र डोरले यांनी केले. या स्पर्धेत जिल्ह्यातील २२ कबड्डी चमू सहभागी झाले आहेत. स्पर्धेसाठी निखिल सिंगनजुडे, वरून खवास, बबन भोयर, नाना चेटुले, विनोद चानोरे, मुकेश भांडारकर, दिनेश नेवारे, अनिल शेंडे, सचिन चेटुले, मयुर सिंगनजुडे, चेतन झलके, कैलाश बोरकर यानी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
क्रीडा स्पर्धेतून युवकांना सकारात्मक ऊर्जा
By admin | Updated: December 27, 2015 00:53 IST