शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथकाने जाणून घेतल्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:46 IST

खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये नोव्हेंबर महिन्यात आलेल्या तुडतुडा रोगामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळण्यासाठी राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये नोव्हेंबर महिन्यात आलेल्या तुडतुडा रोगामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळण्यासाठी राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला होता. त्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या पथकाने गुरूवारला भंडारा तालुक्यातील परसोडी, तुमसर तालुक्यातील बिनाखी, मोहाडी तालुक्यातील आंधळगाव व पालडोंगरी गावाला भेट देऊन शेतकºयांशी चर्चा केली.या भेटीत राज्याचे कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजयकुमार, विभागीय आयुक्त अनुपकुमार उपस्थित होते. केंद्राच्या या पथकात नागपूरचे संचालक डॉ.आर.पी. सिंग, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोईमतूर विभागाचे प्रकल्प समन्वयक डॉ.ए. एच. प्रकाश, उपायुक्त एस. सेल्वराज, खर्च विभागाचे सल्लागार दिनानाथ, केंद्रीय विद्युत अधिकारिता विभागाचे उपसंचालक ओमप्रकाश सुमन, दिल्लीचे मत्स्य संशोधन अधिकारी डॉ.तरूणकुमार सिंग, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ राईस रिसर्चचे संचालक एस.आर. वोलेटी यांचा समावेश होता. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे, स्मिता पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी लोखंडे, तहसिलदार संजय पवार व गजेंद्र बालपांडे उपस्थित होते.परसोडी येथे केंद्रीय पथकाने भेट देऊन ग्रामपंचायत भवनात शेतकऱ्यांशी संवाद साधला. तुडतुड्यामुळे झालेल्या धानाच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकास माहिती दिली. धान पिकाचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. राज्य शासनाने केंद्राकडे मदतीसाठी निधीचा प्रस्ताव पाठविला असून त्या अनुषंगाने पथक तपासणीसाठी आल्याचे पथकातील अधिकाºयांनी सांगितले. शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणे वापरणे गरजेचे असल्याचे पथकाच्या सदस्यांनी सूचविले. येणाऱ्या हंगामात शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणे वापरावे, असे आवाहन केले. त्यानंतर बिनाखी, आंधळगाव व पालडोंगरीला भेट देऊन तुडतुडाग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या भेटीचा सकारात्मक अहवाल केंद्र शासनाला सादर करणार असल्याचे त्यांनी शेतकºयांना सांगितले.