शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा शहरातील समता नगरातील बगिचांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:15 IST

मेंढा रोडवर समता नगर फेज २ ही वसाहत आहे. याठिकाणी संबंधित लेआऊट मालक प्रभात गुप्ता यांनी बगिचांची निर्मिती केली ...

मेंढा रोडवर समता नगर फेज २ ही वसाहत आहे. याठिकाणी संबंधित लेआऊट मालक प्रभात गुप्ता यांनी बगिचांची निर्मिती केली होती. येथे पूर्वी लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारची साधने होती. दररोज सकाळी व संध्याकाळी या वसाहतीसह परिसरातील नागरिक येथे व्यायामासह फेरफटका मारायला येतात. परंतु सध्याच्या परिस्थितीत या बगिचांची अवस्था दयनीय झाली आहे. परिसरात रानगवत व खुरटी काटेरी झाडे वाढल्याने यात विषारी जीवांचा वावर असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू शकते.

प्रौढांकरिता बसण्याच्या खुर्च्यांची मोडतोड झाली असून बसायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. खेळण्याची साधने गंजली असून मोडतोड झाली आहे. लहान मुलांना खेळण्याचा मोह आवरेना तरीही मोडकळीस आलेल्या खेळण्याच्या साधनांवर हौस भागवली जाते. त्यामुळे आता चिमुकल्यांना आपण खेळायचे काय, असा प्रश्न पडला आहे. या प्रभागातील नगरसेवकांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. वसाहतीमधील नागरिकांनी बगिचांचे सौंदर्यीकरण करून ग्रीनजिम लावण्यात यावे, अशी मौखिक मागणी केली होती. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या चार वर्षांच्या काळात नगरसेवकांनी कोणतेही ठोस कामे केले नाही.