लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एकेकाळी शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या तलावांची विद्यमानघडीला अत्यंत दूरवस्था झाली आहे. अतिक्रमणाचा विळखा व प्रशासनाची उदासीनता या दोन मुख्य बाबी विकासात अडसर ठरत आहे. अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या भंडारा शहरातील मिस्किन टँक बगीच्यामधील तलावाला अतिक्रमणामुळे डबक्याचे स्वरूप आले आहे. याकडे पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.भंडारा शहरात बोटांवर मोजण्याइतकेच तलाव नामशेष आहेत. त्यातही त्यांची देखरेख व दुरूस्ती होत नसल्याने तलावाला भकास स्वरूप प्राप्त झाले आहेत. मिस्किन टँक तलाव, खांबतलाव, सागरतलाव, नवतलाव ही काही शहरातील तलावांची नावे असली तरी त्यांच्या देखभालीकडे प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष आहे. विशेषत: मिस्किन टँक तलावाला अतिक्रमणाचा विळखा लाभला आहे.एकेकाळी विस्तीर्ण क्षेत्रात असलेल्या या तलावाला आता अतिक्रमणामुळे डबक्याचे स्वरूप मिळाले आहे. त्यातही सण, उत्सवानंतर या तलावातील गाळ व अन्य साहित्य उपसले जात नसल्याने समस्येत अधिकच भर पडली आहे. ढिवरबांधवांना सदर तलाव लीजवर देण्यात येत असला तरी प्राप्त झालेल्या महसूलातून त्याची देखभाल मात्र होत नसल्याचे दृश्य आहे. तलावाच्या पाळीला लागूनच मोठ्या प्रमाणात गाळ, झाडीझुडपी व कचरा गोळा झाला आहे. या मिस्किन टँक बगीच्यात सकाळ-संध्याकाळी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. बगीच्याची अवस्था काही प्रमाणात चांगली असली तरी बालकांची मनोरंजनात्मक खेळणीही नादुरूस्त आहे.त्यातही तलावाकडे बघितल्यास बगीच्याच्या सौंदर्यात भर पडण्यापेक्षा नागरिक तिथून निघून जाण्यात धन्यता मानतात. अनेक संघटना व नागरिकांनी या तलावासह बगीच्याच्या सौंदर्यीकरणासाठी पालिकेकडे सांगितले. मात्र त्यावर अजुनपर्यंत मोठा निर्णय घेण्यात आलेला नाही.निधीचा वाणवा अपुर्ण मनुष्यबळ या कारणाने मिस्किन टँकचा उद्धार झालेला नाही. पालिका प्रशासनाने वार्षिक अर्थसंकल्पात तलावाच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद करून तलावाला गतवैभव प्राप्त करून देण्याची गरज आहे. सोबतच तलाव पाळीवर असलेले अतिक्रमण निर्मूलन करून विकासात्मक कार्यावर भर देणे महत्वाचे आहे. शहरातील अन्य तलावांच्या दुरूस्तीवरही भर द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तलावाचे डबके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:44 IST
एकेकाळी शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या तलावांची विद्यमानघडीला अत्यंत दूरवस्था झाली आहे. अतिक्रमणाचा विळखा व प्रशासनाची उदासीनता या दोन मुख्य बाबी विकासात अडसर ठरत आहे. अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणाºया भंडारा शहरातील मिस्किन टँक बगीच्यामधील तलावाला अतिक्रमणामुळे डबक्याचे स्वरूप आले आहे.
तलावाचे डबके
ठळक मुद्देअतिक्रमणाचा फटका । भंडारा शहरातील वास्तव