शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

शहरात पॉलिथीनबंदीचा फज्जा

By admin | Updated: June 26, 2015 01:00 IST

पॉलिथीन वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही. त्यासाठी पथक नेण्याचेही ठरले होते.

भंडारा : पॉलिथीन वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही. त्यासाठी पथक नेण्याचेही ठरले होते. तेही नेमण्यात आले नाही. नंतर त्याकडे कर्मचारी व नगरसेवकांनी लक्षही दिले नाही. सोयीस्करपणे सर्वांनी दुर्लक्ष केल्यामुळे योजना कागदोपत्री राहिली.पॉलिथीनचा कचरा शहरात मोठ्या प्रमाणात निघतो. मेडिकलपासून ते भाजीपाला घेण्यासाठी सर्रास कॅरिबॅग वापरली जाते. यूझ अ‍ॅण्ड थ्रो एवढाच उपयोग असल्यामुळे या कचऱ्याचे प्रमाण कमी होण्याची सुतराम शक्यता नाही. शिवाय तो नष्ट होण्यासाठी १०० वर्ष लागतात. या कॅरिबॅग शहरातील नाल्यात जाऊन बसत असल्यामुळे नाल्या तुंबू लागल्या. नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने आरोग्याचे प्रश्न उद्भवत होते. त्यासाठी नगरपालिकेने पॉलिथीन वापरावर चाप लावण्याचा प्रयत्न केला. स्थानिक प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने व्यापारी, विक्रेते, नगरसेवक, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. त्यात पॉलिथीन वारावर बंदी घातली. वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या निर्णयाची अंमलबजावणी महिनाभरही झाली नाही. सरसकट लोकांनी कॅरिबॅग वापरण्यास सुरुवात केली. अल्पावधीत शहरात जैसे थे परिस्थिती झाली.व्यापाऱ्यांनी कॅरिबॅगमध्ये साहित्य देण्यास सुरुवात केल्यामुळे विक्रेते, हातगाडे, भाजीपाला विक्रेत्यांनी अनुकरण केले. त्यामुळे कॅरिबॅगचा कचरा कमी झाला नाही. आता त्यात भरच पडत असल्यामुळे शहरात घाण वाढत आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी शिळे अन्न अशा पॉलिथिन पिशव्यातून टाकले जाते हे अन्न खाण्यासाठी जनावरे या पिशव्या फाडतात. मात्र तरीही काही भाग पोटात गेल्याने आजार जडत आहेत. (प्रतिनिधी)