शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

लॉकडाऊनमध्येही श्रेयासाठी राजकीय धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:01 IST

भंडारा हा विकासात मागासलेला जिल्हा आहे. उद्योग, पुर्नसवसन, सिंचनासह अनेक प्रश्न आजही कायम आहेत. यासाठी कोणतेच भरीव प्रयत्न होताना दिसत नाही. उलट राजकीय नेतृत्वाच्या अभावाने येथील प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास अडचणी येतात. मात्र एखादा प्रकल्प अथवा विकास काम पूर्ण झाले की, सुरु होते श्रेय लाटण्याची चढाओढ. सर्वत्र तीन महिन्यांपासून कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव वाढत आहे.

ठळक मुद्देविकासकामांचा डांगोरा : प्रकल्पाचे पाणी असो की बायपासचा प्रश्न,

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाने सर्वसामान्य नागरिक भीतीच्या सावटात असताना जिल्ह्यात मात्र लॉकडाऊनच्या काळातही श्रेयासाठी राजकीय धडपड सुरु आहे. आपणच प्रश्न कसा मार्गी लावला याचा डांगोरा पिटला जात आहे. प्रकल्पाचे सिंचनासाठी सोडलेले पाणी असो की भंडारा शहरातील बायपासचा प्रश्न. लहानसहान विकासकामातही एकमेकांवर कुरघोडी करताना दिसतात.भंडारा हा विकासात मागासलेला जिल्हा आहे. उद्योग, पुर्नसवसन, सिंचनासह अनेक प्रश्न आजही कायम आहेत. यासाठी कोणतेच भरीव प्रयत्न होताना दिसत नाही. उलट राजकीय नेतृत्वाच्या अभावाने येथील प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास अडचणी येतात. मात्र एखादा प्रकल्प अथवा विकास काम पूर्ण झाले की, सुरु होते श्रेय लाटण्याची चढाओढ. सर्वत्र तीन महिन्यांपासून कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव वाढत आहे. सर्वसामान्य कोरोनामुळे धास्तावलेले आहेत. अशा स्थितीत त्यांना धीर देण्याऐवजी राजकीय नेते केवळ श्रेय घेण्यात मशगूल असल्याचे दिसत आहेत. पावसाने दडी मारल्याने धानाच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला. शेतकरी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी करू लागले. प्रत्येक राजकीय नेत्याने आपल्या पद्धतीने वरिष्ठांना माहिती दिली. प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आले. मात्र त्यानंतर राजकीय नेत्यांमध्ये आपणच पाणी सिंचनासाठी सोडल्याचा डांगोरा पिटणे सुरु केले. काही ठिकाणी तर जलपूजनाचे कार्यक्रमही घेण्यात आले. शेतकऱ्यांना केवळ सिंचनासाठी पाणी हवे होते. मात्र या पाणी सोडण्यातही राजकारण करून श्रेय लाटण्याची मोठी स्पर्धा दिसून आली. भंडारा शहरातील बायपासचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून रखडला आहे. अलिकडे राष्ट्रीय महामार्गाला सहापदरी बायपास आणि भंडारा-तुमसर बायपास मंजूर झाला. यासाठी स्थानिक राजकीय नेत्यांनी निश्चितच प्रयत्न केले. त्यांना यशही आले. परंतु हे कुण्या एकट्याचे यश नसून सर्वांनी एकत्र येऊन सोडविलेला प्रश्न आहे. मात्र मंजुरीपासून ते निधी मिळविण्यापर्यंत आपणच कसा पाठपुरावा केला याचा लेखाजोखा प्रसिद्धीमाध्यमातून जनतेपुढे मांडण्याचा सपाटा राजकीय नेत्यांनी केला आहे. पुनर्वसनाच्या प्रश्नातही असेच केले जात आहे. कोणताही विकासाचा प्रकल्प आला की, त्याचे श्रेय लाटण्यासाठी येथे कायम स्पर्धा असते. विकास व्हावा ही प्रत्येकाचीच इच्छा आहे. परंतु विकासाआड श्रेय लाटणे कितपत योग्य आहे असा सवाल पुढे येत आहे.अपूर्ण प्रकल्पाचे श्रेय कुणाला?जिल्ह्यात अनेक प्रकल्प अपूर्ण आहेत. निधीअभावी या प्रकल्पांना गती मिळत नाही. मात्र हा प्रकल्प का अपूर्ण आहे याचा कुणी विचार करताना दिसत नाही. गोसे प्रकल्पातील बाधितांचा प्रश्न कायम आहे. तणसापासून इथेनॉलचा प्रकल्प सर्वांच्या विस्मरणात गेला आहे. भंडारा शहरातील महिला रुग्णालयाचा प्रश्नही अधांतरी आहे. धान खरेदीसाठी गोदामाचा तुटवडा दरवर्षी जाणवतो. परंतु या बाबींकडे कुणाचेही लक्ष नाही. मात्र यातील एखादा प्रकल्प पूर्ण झाला की मग मात्र श्रेय घेण्यासाठी सर्वच पुढे येतात. गत काही वर्षात श्रेयाची ही लढाई सर्वसामान्यांसाठी मनोरंजनाचा विषय होऊ पाहत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या