शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांनी मतांचे राजकारण केले

By admin | Updated: August 30, 2016 00:17 IST

संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी नागपुर करारानुसार विदर्भवासीयांना सहा आश्वासने देण्यात आली होती.

साकोलीत जाहीर सभा : श्रीहरी अणे यांचे प्रतिपादनसाकोली : संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी नागपुर करारानुसार विदर्भवासीयांना सहा आश्वासने देण्यात आली होती. त्यापैकी तीन आश्वासने महाराष्ट्र सरकारने पाळली असली तरी लोकहिताच्या प्रमुख तीन आश्वासने पाळू शकली नाही. विदर्भातून गठ्ठा मते घेऊन गेलेले विविध राजकीय पक्षांनी फक्त मतांचे राजकारण केले. कधी जातीच्या नावावर तर कधी धर्माच्या नावावर भुलथापा देऊन राजकारण झाले. या विदर्भात सर्वच जाती धर्माची लोक एकत्रित राहतात. हिंदु-मुस्लिम दंगलीची एकही घटना घडली नाही. व भविष्यात घडणार नाही ही विदर्भवासीयांची ताकद आहे, असे प्रतिपादन माजी महाअधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले. लहरीबाबा मठ देवस्थान परिसर साकोली येथे वेगळ्या विदर्भासाठी आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते, अनील जवादे, निरंजन खांदेवाले, सुरेद्र पारधी, नरेंद्र पालांदूरकर, बंडू धोतरे, छौलबिहारी अग्रवाल, डॉ. गोविंद कोंडवाने, गुरुमत सिंह चावला, कमलेश भजनकर, उर्मिला आगाशे, तालुका अध्यक्ष प्रविण भांडारकर उपस्थित होते.यावेळी अ‍ॅड. अणे म्हणाले, विदर्भाच्या मागणीसाठी राजकीय पाठबळ असणे आवश्यक आहे. यापुर्वी वेगळ्या विदर्भासाठी विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केली, राजकारण केले. मात्र ऐनवेळीच या राजकीय पक्षांनी वेगळ्या विदर्भासाठी काढता पाय घेतला. यापुर्वी विदर्भासाठी आंदोलन झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती वेळेस नागपुर करारानुसार विदर्भवासीयांना शासकीय निमशासकीय शाळामहाविद्यालय व कार्यालयात २३ टक्के आरक्षण देण्याचा नियम असतांना या नियमाचे उल्लंघन होत आहे. हा विदर्भवासीयांवर एकप्रकारचा अन्याय आहे. त्यामुळे आता वेगळा विदर्भ होणे काळाची गरज आहे. त्याशिवाय विदर्भाचा विकास होऊच शकत नाही. असे साक्ष विदर्भवासीयांनी आता एकत्र येवून ताकद दाखविण्याची गरज असल्याचे सांगितले. सभेच्या पूर्वी वेगळ्या विदर्भासाठी रॅली काढण्यात आली. संचालन राकेश भास्कर यांनी केले. या कार्यक्रमाला शब्बीरभाई पठाण, दिपक जांभुळकर, बाळू गिऱ्हेपुंजे, मनोज कटकवार, यशपाल कऱ्हाडे, विनोद भुते यांच्यासह मोठ्यासंख्येने लोक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)वेगळ्या विदर्भाला तालुका अधिवक्ता संघाचा पाठिंबासाकोली तालुका अभिवक्ता संघाने पृथक विदर्भ राज्याच्या आंदोलनाला समंती दर्शविलेली असून तसा ठराव जिल्हाधिकारी यांना पाठविलेला आहे. त्यामुळे विदर्भ राज्याच्या मागणीसाठी साकोली अधिवक्ता संघाचा पाठिंबा अ‍ॅड. अणेना साकोलीच्या जाहिरसभेत दर्शविण्यात आला. यावेळी अ‍ॅड. बापूसाहेब अवथरे, अ‍ॅड.अण्णा परशुरामकर, अ‍ॅड.सुरेश पाटील, अ‍ॅड टी. जे. गिऱ्हेपुंजे, अ‍ॅड. अशोक करवडे, अ‍ॅड. भार्गेश्वर भुरले, अ‍ॅड. एम. एम. गणवीर, अ‍ॅड. बी. संग्रामे उपस्थित होते.