शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
5
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
6
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
7
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
8
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
9
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
10
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
11
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
12
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
13
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
14
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
15
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
16
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
17
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
18
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
19
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
20
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!

ग्रामीण भागातील राजकीय समीकरणे बदलणार

By admin | Updated: January 20, 2015 00:01 IST

जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात तर जिल्ह्यातील सात पंचायत समिती गणाची सोडत त्या-त्या तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी

भंडारा : जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात तर जिल्ह्यातील सात पंचायत समिती गणाची सोडत त्या-त्या तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी आणि संबंधित तहसीलदार यांच्या उपस्थितीत आज सोमवारला काढण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण करण्यात आल्यामुळे आता महिलांचा सत्तेतील वाटा पुरुषांबरोबरचा असणार आहे. जिल्ह्यातील सात पंचायत समितीमधील १०४ गणाच्या आरक्षणानंतर ग्रामीण भागातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. मागीलवेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असलेल्या बहुतांश सदस्यांना आरक्षण सोडतीमुळे घरी बसण्याची वेळ आली आहे. जून किंवा जुलै महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांवर उमेदवारांचा शोध घेण्याची वेळ आली असून यावेळी ठिकठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. (लोकमत चमू) साकोली : विद्यमान ११ सदस्यांना फटकासाकोली : १४ सदस्यीय साकोली पंचायत समितीच्या आरक्षणाची सोडत उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, तहसीलदार हंसा मोहने यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात काढण्यात आली. यावेळी बादल महावीर टेंभुर्णे या इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्याच्या हाताने ईश्वरचिठ्या आरक्षण काढण्यात आले. या आरक्षण सोडतीचा फटका विद्यमान ११ सदस्यांना बसणार असून त्यांना निवडणूक लढविण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रासाठी किंवा अन्य क्षेत्र शोधण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. आरक्षणानुसार किन्ही (एकोडी) क्षेत्र ना.मा.प्र., एकोडी क्षेत्र सर्वसाधारण, पिंडकेपार क्षेत्र ना.मा.प्र., किन्ही (मोखे) क्षेत्र अनुसूचित जाती महिला प्रवर्ग, बोदरा क्षेत्र अनुसूचित जमाती, कुंभली क्षेत्र सर्वसाधारण महिला, साकोली क्षेत्र सर्वसाधारण, विर्शी क्षेत्र ना.मा.प्र. महिला, सेंदुरवाफा क्षेत्र अनुसूचित जाती, परसोडी क्षेत्र सर्वसाधारण, वडद क्षेत्र ना.मा.प्र. महिला, पळसगाव (सोनका) सर्वसाधारण महिला, सानगडी क्षेत्र अनुसूचित जाती महिला, सासरा क्षेत्र सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. साकोलीत यांना बसला फटकाया आरक्षणानुसार सभापती नारायण वरठे, उपसभापती श्रावण बोरकर, पंचायत समिती सदस्य सुषमा पटले, प्रेमलाल राऊत, मंदा कापगते, वंदना उके, मदन रामटेके, दिगांबर लांजेवार, यादोराव कापगते व जनार्दन डोंगरवार यांना फटका बसला आहे.तुमसर : दिग्गजांचे मतदारसंघ राखीव तुमसर : तुमसर पंचायत समिती निर्वाचन गणाच्या आरक्षण सोडतीत नऊ महिला व नऊ पुरुष सदस्यांची वर्णी लागणार आहे. जिल्हा परिषद क्षेत्राकरिता सात महिला व दोन पुरुष सदस्य जिल्हा परिषदेत जातील. या आरक्षण सोडतीत प्रस्थापितांचे मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे.१८ सदस्यीय तुमसर पंचायत समितीत आरक्षणानुसार आष्टी क्षेत्र अनुसूचित जमाती, नाकाडोंगरी क्षेत्र सर्वसाधरण, चिखला क्षेत्र सर्वसाधारण, सीतासावंगी क्षेत्र अनुसूचित जाती (महिला), बपेरा (सिहोरा) क्षेत्र सर्वसाधारण, चुल्हाड क्षेत्र सर्वसाधारण, सिहोरा क्षेत्र सर्वसाधारण महिला, सिंदपुरी क्षेत्र ना.मा.प्र., सिलेगाव क्षेत्र सर्वसाधारण, येरली क्षेत्र सर्वसाधारण महिला, गर्रा क्षेत्र ना.मा.प्र., डोंगरी (बुज) क्षेत्र सर्वसाधारण, लोहारा क्षेत्र ना.मा.प्र. महिला, मिटेवानी क्षेत्र १४ अनुसूचित जमाती महिला, खापा क्षेत्र ना.मा.प्र. महिला, मांढळ क्षेत्र सर्वसाधारण महिला, माडगी क्षेत्र ना.मा.प्र. महिला आणि देव्हाडी क्षेत्र अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे.तुमसर तालुक्यात नऊ जिल्हा परिषद गट आहे. यात आरक्षणात सात महिला व दोन पुरुष या खेपेला जिल्हा परिषदमध्ये नेतृत्व करतील.तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षणात दिग्गजांचे मतदारसंघ आरक्षित झाले आहेत हे विशेष.भंडारा : प्रस्थापितांना बसला धक्काभंडारा : भंडारा तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिल्लारी आणि तहसीदार सुशांत बन्सोड यांच्या उपस्थितीत पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत काढण्यात आली. यात आठ सर्वसाधारण प्रवर्गापैकी चार महिला, नामाप्रच्या पाच जागांपैकी तीन महिला, अनुसूचित जाती प्रवर्गातून चार जागांपैकी दोन असे नऊ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत.यात गोपीवाडा क्षेत्र अनुसूचित जाती महिला, भोजापूर क्षेत्र अनुसूचित जाती महिला, कोथुर्णा क्षेत्र सर्वसाधारण महिला, खमारी क्षेत्र नामाप्र, गणेशपूर क्षेत्र नामाप्र महिला, बेला क्षेत्र सर्वसाधारण, शहापूर क्षेत्र नामाप्र महिला, ठाणा क्षेत्र सर्वसाधारण, सावरी (जवाहरनगर) सर्वसाधारण, कोंढी क्षेत्र अनूसूचित जाती, मानेगाव क्षेत्र सर्वसाधारण महिला, सिल्ली क्षेत्र नामाप्र, माटोरा क्षेत्र नामाप्र महिला, आमगाव क्षेत्र सर्वसाधारण महिला, धारगाव क्षेत्र सर्वसाधारण महिला, गुंथारा क्षेत्र अनुसूचित जमाती, गराडा (बुज) क्षेत्र सर्वसाधारण, पहेला क्षेत्र अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव करण्यात आलेला आहे. लाखांदूर :सहा महिलांना पं.स.मध्ये संधी लाखांदूर : येथील तहसील कार्यालयात पंचायत समिती निवडणुकीची आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) जी.जी. जोशी, तहसीलदार विजय पवार उपस्थित होते. लाखांदूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा क्षेत्र असून पंचायत समितीचे १२ गण आहेत. यामध्ये मासळ अनुसूचित जाती (महिला), मांढळ ओबीसी (महिला), जैतपूर ओबीसी (महिला), दिघोरी सर्वसाधारण, बारव्हा सर्वसाधारण (महिला), लाखांदूर अनुसूचित जाती प्रवर्ग, सरांडी (बु.) सर्वसाधारण महिला, मोहरना सर्वसाधारण, भागडी ओबीसी, कुडेगाव सर्वसाधारण, पिंपळगाव अनसुूचित जमाती, सोनी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत. मोहाडीत महिलांचा बोलबालामोहाडी : येथील तहसील कार्यालयात तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्या उपस्थितीत पंचायत समिती आरक्षण सोडत काढण्यात आली. आठ जिल्हा परिषद क्षेत्र असलेल्या मोहाडी तालुक्यात पंचायत समितीचे १६ गण आहेत. यामध्ये कांद्री गणात अनुसूचित जमाती प्रवर्ग, जांब गणात अनुसूचित जाती प्रवर्ग, उसर्रा ओबीसी महिला प्रवर्ग, डोंगरगाव सर्वसाधारण महिला प्रवर्ग, आंधळगाव ओबीसी प्रवर्ग, हरदोली सर्वसाधारण प्रवर्ग, मोहाडी सर्वसाधारण महिला प्रवर्ग, रोहा सर्वसाधारण प्रवर्ग, देव्हाडा (खुर्द), सर्वसाधारण महिला प्रवर्ग, करडी अनुसूचित जमाती महिला प्रवर्ग, मुंढरी (बुज) ओबीसी महिला प्रवर्ग, पालोरा सर्वसाधारण प्रवर्ग, मोहगाव देवी ओबीसी प्रवर्ग, वरठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग, पाचगाव सर्वसाधारण महिला प्रवर्ग, खमारी (बुज) सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहेत. लाखनी : दिग्गजांना बसणार धक्कालाखनी : पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०१५ च्या आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयात काढण्यात आली. तालुक्यात १२ निर्वाचन गण आहेत. सालेभाटा क्षेत्र नागरिकांचा मागास प्रवर्ग, लाखोरी सर्वसाधारण, लाखनी अनुसूचित जाती, पिंपळगाव (सडक) सर्वसाधारण, मुरमाडी (सावरी) अनुसूचित जाती महिला, केसलवाडा (वाघ), अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. पोहरा सर्वसाधारण स्त्री, कनेरी सर्वसाधारण मुरमाडी (तुपकर), सर्वसाधारण, कोलारी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, पालांदूर चौरास, सर्वसाधारण स्त्री, किटाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला याप्रमाणे पंचायत समिती निवडणुकांचे आरक्षण घोषित करण्यात आले. तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षणाच्या सोडतीची प्रतीक्षा होती. यानुसार राजकीय समीकरण बदलणारे आहे. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी गटांचे आरक्षण त्यामुळे महिलांसाठी आरक्षित असलेले क्षेत्र यामुळे २०१५ च्या निवडणुकांत नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहो. विशेषत: लाखनी शहरात अनुसूचित जातीच्या उमेदवारांना बऱ्याच वर्षानंतर प्राधान्य मिळणार आहे. मुरमाडी सावरी क्षेत्रात अनुसूचित जातीच्या महिलेला उमेदवारी मिळणार आहो. सोडतीनंतर राजकीय पक्षांना उमेदवार शोधण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. केसलवाडा (वाघ) क्षेत्रात अनुसूचित जमातीच्या महिला उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. पोहरा क्षेत्रात पुन्हा एकदा सर्वसाधारण गटातील महिलेला संधी मिळणार आहे.