लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ९१ हजार ८९५ बालकांना १९ जानेवारी रोजी पोलिओ डोज देण्यात येणार आहे. यासाठी २ हजार ५७३ कर्मचारी व अधिकारी कार्यरत राहणार असून मोहिमेचे योग्य नियोजन करुन लसीकरण कार्यक्रम यशस्वी करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी एम. ज. प्रदीपचंद्रन यांनी येथे दिल्या.पल्स पोलिओ लसीकरण आढावा बैठकीचे गुरुवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद मोटघरे, मोहम्मद साजीद आदी उपस्थित होते.जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात ११०२ लसीकरण केंद्र तयार करण्यात येणार आहे. शहरी व ग्रामीण भागातील नियमित लाभार्थी, वीटभट्या, ऊस तोडणी कामगार स्थलांतरीत वस्त्या, बांधकाम सुरु असलेले ठिकाण अश्या जोखमीच्या भागातील ९१ हजार ८९५ बालकांना लस देण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी २५७३ कर्मचारी कार्यरत राहणार आहे. बुथवरचे काम आटोपल्यानंतर शहरी भागात सहा दिवस व ग्रामीण भागात चार दिवस पीपीआय कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सदर लसीकरणासाठी सहा हजार ८०० व्हायल (१ लाख ३६ हजार डोज) लसींचा साठा मागणी करण्यात येणार आहे.यासाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त महिला बाल विकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडीसेविका, मदतनीस, स्वयंसेवक आशावर्कर यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. रेल्वेस्थानक व बसस्थानक म्हणून ६१ ठिकाणी स्ट्राझिस्ट टीम नियुक्त करण्यात आला आहे. पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत १९ जानेवारी रोजी होणाºया लसीकरणात बालकांना डोज देवून ही मोहिम यशस्वी करावी, एकही बालक पोलिओ डोजपासून वंचित राहणार नाही. याची दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंदन व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी या बैठकीत केले आहे.पाच दिवस घरोघरी जाऊन लसीकरणबुथवरील लसीकरण झाल्यानंतर असंरक्षीत बालकांना पोलिओ डोज पाजण्यासाठी ग्रामीण भागात २० ते २२ जानेवारी आणि शहरी भागात २० ते २४ जानेवारीपर्यंत पाच दिवस घरोघरी जावून पोलिओ डोज न मिळालेल्या बालकांची माहिती घेऊन त्यांना डोज देण्यात येईल. यासाठी ग्रामीण भागात ८७२ टीम तीन दिवस कार्यरत राहून अंदाजे दोन लाख ४९ हजार २४३ घरांचा भेटी देतील. घरभेटी कार्यक्रमांचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात ९२ हजार बालकांना पोलिओ डोज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 06:00 IST
पल्स पोलिओ लसीकरण आढावा बैठकीचे गुरुवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद मोटघरे, मोहम्मद साजीद आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात ९२ हजार बालकांना पोलिओ डोज
ठळक मुद्दे११०२ बुथ : १९ जानेवारी रोजी लसीकरण