शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

९३ हजार बालकांना देणार पोलिओचा डोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 21:54 IST

जिल्हयात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम १० मार्च रोजी राबविण्यात येणार आहे. भंडारा जिल्हयात एकूण ९३ हजार ३०१ बालकांना पोलिओ डोज देण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे१० मार्चला मोहीम : आरोग्य विभाग सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हयात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम १० मार्च रोजी राबविण्यात येणार आहे. भंडारा जिल्हयात एकूण ९३ हजार ३०१ बालकांना पोलिओ डोज देण्यात येणार आहे.सन १९९५-९६ पासून पोलिओ निर्मूलन करण्यासाठी भारतात विशेष पल्स पोलिओ राबविण्यात येत आहे. सन २०१० मध्ये डिसेंबरपर्यंत पाच पोलिओ रुग्ण आढळून आले होते. परंतु सन २०११ नंतर राज्यात एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नाही. अथक परिश्रमामुळेच १३ जानेवारी २०११ नंतर आजतागायत एकही पोलीओ रुग्ण आढळून आलेला नाही. भारताला पोलिओ निर्मूलनाचे प्रमाणपत्र मार्च २०१४ मध्ये मिळालेले आहे. त्यानुषंगाने जिल्हयात ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ९१३ बुथ व शहरी भागातील १०६ बुथची व्यवस्था करण्यात आली आहे.सदर कार्यक्रमासाठी २०१४ मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच या मोहिमेंतर्गत अति जोखमेच्या क्षेत्रामध्ये सुध्दा लसीकरण करण्यात येणार आहे. जसे विट भट्टी, झोपडपट्टी, भटक्या जमाती, बांधकाम जागा व इतर मायग्रेटरी भागाचा यात सामावेश आहे. सदर मोहिमेसाठी ७ हजार व्हॉयल लसीचा साठा प्राप्त झाला आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामिण रुग्णालयात सदर मोहिमेसाठी सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.मोहिमेच्या अनुषंगाने सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की, ज्या प्रमाणे मागील सर्व मोहिमेत जास्तीत जास्त संख्येने बुथवर हजर राहून बालकांना पोलिओ डोज पाजून घेतले होते.त्याचप्रमाणे १० मार्च २०१९ जास्तीत जास्त संख्येने बुथवर उपस्थित राहून आपल्या पाच वषार्खालील सर्व बालकांना पोलिओचा डोज पाजावा व आपल्या बाळाला संरक्षित करुन सहकार्य करावे. तसेच बसस्टॅड, रेल्वे स्टेशन, टोल नाका येथे ६० ट्रांझिट बुथची व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी ४८ फिरते बुथची व्यवस्था आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेली आहे.