शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या वर्दी आडून लूटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 01:25 IST

पैशांच्या हव्यासापोटी हद्दीबाहेर जाऊन कारवाईचा बनाव करुन एलसीबी भंडाराचे शिपाई सर्व सामान्यांची लूटमार करीत असल्याचा प्रकार तालुक्यात पहावयास मिळाला. पोलीस खात्यातील प्रत्येक विभागात वेगवेगळे बिट तयार करुन त्या बिटाकरिता कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपाच शिपायांचा समावेश : कारवाईत खासगी चारचाकी वाहनाचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पैशांच्या हव्यासापोटी हद्दीबाहेर जाऊन कारवाईचा बनाव करुन एलसीबी भंडाराचे शिपाई सर्व सामान्यांची लूटमार करीत असल्याचा प्रकार तालुक्यात पहावयास मिळाला. पोलीस खात्यातील प्रत्येक विभागात वेगवेगळे बिट तयार करुन त्या बिटाकरिता कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आले आहे. अधिकाऱ्या व्यतिरिक्त व बिटच्या नियुक्त कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणत्याही पोलीस कर्मचारीला कुठेही जात कोणतीही कारवाई करताच येऊ शकत नाही, असा कायदा आहे. परंतु पैशाच्या हव्यासापोटी व झटपट श्रीमंत होण्याच्या नादात बाहेरील जिल्ह्यातून आलेले व स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथे केवळ शिपाई या पदावर नियुक्त झालेले पाच शिपाई यांना कोणतेही अधिकार नसतांना वा त्यांची कोणत्याही बीटवर नियुक्ती नसतांना एलसीबी पोलिसांचा धाक दाखवून जिल्ह्यात कुठेही स्वत:च्या गाडीनेच फिरुन नागरिकांची लुटमार करीत आहेत.कारण कोणताही पोलीस कर्मचारी अधिकारी हा बाहेर कुठल्याही कामानिमित्त बाहेर जात असेल तर त्याची स्टेशन डायरीवर नोंद घेतली जाते. परंतू सदर शिपाई हे डायरीवर कोणतीही नोंद न करता जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात निघून जातात आणि मग एलसीबीच्या वर्दी आडून ते अनेक दिवसापासून वसुली करीत आहेत.१८ जुलै रोजी ते पाच पोलीस शिपाई सकाळच्या दरम्यान नाकाडोंगरी रोडवर आले असता घरकुलासाठी रेती वाहुन नेणाºया दोन ट्रॅक्टरला त्या शिपायांनी पकडले. त्यांच्याकडून ५० हजार रुपये प्रती ट्रॅक्टर मागणी केली. ज्या अर्थी तत्कालीन पालकमंत्री बावनकुळे यांनी ट्रॅक्टरला न पकडण्याचे आदेश निर्गमित केले होते. तरीदेखील ट्रॅक्टर आत घालण्याची भीती दाखवून प्रती ट्रॅक्टर २० हजार असे ४० हजार रुपये घेवून त्यांना सोडले. हा लूटमार केलेला पैसा कुणाच्या घशात जातो. अधिकाºयांना हिस्सा जात असल्यामुळे अधिकाºयांचे त्या शिपायाला पाठबळ तर नाही ना? जर असे असेल तर कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे वर्दी आडून होणाºया गोरखधंद्याला वेळीच लगाम लावण्याची येथे आवश्यकता आहे.पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरजतुमसर तालुक्यात गत अनेक महिन्यांपासून अवैध व्यावसायिकांकडून वसूली केली जात असल्याची माहिती आहे. मात्र सदर पोलीस हे तुमसर पोलीस ठाण्यातील नसून ते कुठले आहेत याची माहिती रक्कम देणाºया व्यावसायिकांना नसते. शहनिशा करण्याचा प्रयत्न झाल्यास मोठी कारवाई दाखवून अवैध व्यवसाय बंद करण्याची धमकी दिली जाते. यामुळे व्यावसायिक रक्कम देऊन गप्प राहत असल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :Policeपोलिस