शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाणे उद्घाटनाचा मुहूर्त टळला

By admin | Updated: September 12, 2015 03:14 IST

मोहाडी तालुक्यातील करडी व वरठी पोलीस ठाणेच्या उद्घाटनाचा मुहूर्त पोलीस विभागाचे वतीने ११ सप्टेंबर रोजी ठरविण्यात आला होता.

करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी व वरठी पोलीस ठाणेच्या उद्घाटनाचा मुहूर्त पोलीस विभागाचे वतीने ११ सप्टेंबर रोजी ठरविण्यात आला होता. त्यासंबंधाने मान्यवरांना माहितीही दिली गेली होती. मात्र १० सप्टेंबर रोजी उद्घाटनाचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आल्याची सबब पुढे करीत सोहळा रद्द करण्यात आला. पुढील तारखेपर्यंत पुन्हा उद्घाटनाच्या मुहूर्ताची प्रतीक्षा करावी लागणार आहे.सन १९६२ पासून करडी पोलीस ठाणेची मागणी नागरिकांकडून होत होती. त्या मागणीला सन २०१३-१४ मध्य मंजूरी मिळाली. तब्बल ५३ वर्षानंतर नागरिकांच्या मागणीला न्याय मिळाला. माजी आमदार अनिल बावनकर यांनी त्यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी करडी पोलीस चौकीच्या जागी पोलीस ठाण्याला मान्यता दिली. याच काळात वरठी पोलीस ठाण्याला सुद्धा मंजुरी प्रदान करण्यात आली. अखेर न्याय मिळाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली गेली. करडी येथे पोलीस चौकी भाड्याच्या घरात आहे. चौकीसाठी गरदेव चौकाजवळील जागा विकत घेतली गेली. परंतु चौकीसाठी बांधकाम झालेले नव्हते. सन २०१४ मध्ये सदर जागेवर चौकीचे बांधकाम करण्यात आले. यात चौकी कार्यालय, दोन निवासस्थाने यांचा समावेश आहे. आज चौकीऐवजी पोलीस ठाणेला मंजुरी मिळाली. जवळपास ५० ते ५२ कर्मचाऱ्यांचा 'स्टॉप' त्यासाठी मंजूर असल्याचे सांगण्यात येते. एवढ्या कर्मचाऱ्यांसाठी निवासाची सोय या ठिकाणी नाही. यासाठी प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. वरठी येथेसुद्धा निवासस्थाने व प्रशस्त कार्यालयाची कमतरता आहे. सन १९१३-१४ मध्ये करडी व वरठी पोलीस ठाणेला मंजुरी मिळाली असली तरी उद्घाटनाचा मुहूर्त वर्षभरापासून सापडत नव्हता. अखेर तो मुहुर्त सापडला ११ सप्टेंबर रोजी पोलीस विभागाचे वतीने उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली. पोलिसांची चमू सुद्धा त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी पाठविली गेली. खासदार व आमदार महोदयांबरोबर इतरांना सुद्धा निमंत्रीत केल्या गेले. मात्र दि. १० सप्टेंबर रोजीच उद्घाटनाचा मुहुर्त पुढे ढकलण्यात आला. नवीन मुहूर्तासाठी आता पुढील तारखेची नागरिकांना प्रतिक्षा करावी लागणार आहे. (वार्ताहर)