शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस संरक्षण, एसटी बस मात्र आगारातच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 05:00 IST

भंडारा विभागातील सहा आगाराची बससेवा गत ४१ दिवसांपासून ठप्प झाली आहे. दहा दिवसांपासून बससेवा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरुवातीला साकोली आगारातून बस सुटली. या बसला पोलिसांनी संरक्षण दिले. त्यानंतर भंडारा आगारातूनही दोन बस निघाल्या. बसच्या फेऱ्या सुरू असून त्याला प्रवाशांना मोठा प्रतिसादही मिळत आहे. मात्र, केवळ चार बस सुरू असून यामुळे प्रवाशांना तेवढा फायदा होत नाही.  ३६३ बस  आगारात उभ्या आहेत. कर्मचारी संपावर ठाम आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटायचे नाव घेत नसल्याने अधिकाऱ्यांनी आता काही कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन बससेवा सुरू केली. संपकरी कर्मचाऱ्यांचा विरोध नसला तरी त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्यात येत असले तरी कामावर यायला कर्मचारी तयार नाही. भंडारा विभागातील सहा आगाराची बससेवा गत ४१ दिवसांपासून ठप्प झाली आहे. दहा दिवसांपासून बससेवा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरुवातीला साकोली आगारातून बस सुटली. या बसला पोलिसांनी संरक्षण दिले. त्यानंतर भंडारा आगारातूनही दोन बस निघाल्या. बसच्या फेऱ्या सुरू असून त्याला प्रवाशांना मोठा प्रतिसादही मिळत आहे. मात्र, केवळ चार बस सुरू असून यामुळे प्रवाशांना तेवढा फायदा होत नाही.  ३६३ बस  आगारात उभ्या आहेत. कर्मचारी संपावर ठाम आहेत.

संपकऱ्यांचा विरोध नाही पण कामावरही नाही- भंडारा विभागातील १४४३ कर्मचाऱ्यांपैकी १२६५ कर्मचारी संपात सहभागी झाले होते. सुरूवातीला १७८ कर्मचारी कामावर आले. - गत दहा दिवसापासून बससेवा सुरू झाली असून भंडारा आगारातील तीन, गोंदिया पाच, साकोली तीन, तुमसर एक, तिरोडा १२, पवनी एक असे चालक वाहक कामावर आले. परंतु केवळ चारच बसेस सुरू करण्यास महामंडळाला यश आले.

लालपरी शिवाय प्रवास नाही

एसटीच्या संपाने बाहेरगावी जाणे महागले आहे. खासगी वाहनातून प्रवास करताना अधिक पैसे मोजावे लागतात. वेळेवर वाहन मिळण्याची शक्यता नसते. त्यामुळे लालपरी लवकरात लवकर सुरू करावी. ग्रामीण भागात तर खाजगी वाहने येण्यासही तयार नाही.    - महेश सोनवने, प्रवासी

एसटीचा प्रवास सुरक्षित असतो. मात्र आता नाईलाजाने बाहेरगावी जाण्यासाठी खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. आधीच या वाहनात प्रवासी कोंबून असतात. त्यात अनियंत्रित वेगाने वाहन चालविली जाते. त्यामुळे या  प्रवास करणे धोकादायक वाटते.    - मिनाक्षी कांबळे, प्रवासी

एसटी नियंत्रक म्हणतात.....

कर्मचाऱ्यांनी कामावर यावे यासाठी प्रयत्न केले जात आहे. सध्या भंडारा व साकोली आगारातून चार बसेस सुरू असून त्याला प्रवाशांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.         - डॉ. चंद्रकांत वडसकर, वाहतूक अधिकारी.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप