शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटील भरतीत घोळ

By admin | Updated: November 21, 2015 00:33 IST

पोलीस पाटील पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेत पहिल्या क्रमांवर असलेल्या उमेदवाराला वगळून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला नियुक्ती देण्यात आली.

हलबीटोलातील प्रकार : उपविभागीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीपांढरी : पोलीस पाटील पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेत पहिल्या क्रमांवर असलेल्या उमेदवाराला वगळून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला नियुक्ती देण्यात आली. परिसरातील ग्राम हलबीटोला येथे हा प्रकार घडला असून यातून पोलीस पाटील भरतीत घोळ झाल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे. यात सदर भरती प्रक्रियेला जबाबदार उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गोपाल राऊत व इतर काही लोकांनी केली आहे. देवरी, आमगाव, सालेकसा व सडक-अर्जुनी तालु्क्यातील पोलीस पाटलांच्या रिक्त पदांसाठी खासगी एजंसीमार्फत परीक्षा घेण्यात आली. यात गोपाल इंदल राऊत (३३, रा. हलबीटोला) यांना लेखी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळाले. तसेच तोंडी परीक्षेत सर्व प्रश्नांचे अचूक उत्तर दिले. यामुळे यादीत त्यांचे नाव क्रमांक १ वर असतानाही क्रमांक तीनच्या उमेदवाराला नियुक्त करण्यात आले. त्यामुळे सदर पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये घोळ झाल्याची शंका आहे.हलबीटोला (पांढरी) या गावामध्ये ९० टक्के जनता आदिवासी समाजाची आहे. तरीपण सदर गावाच्या पोलीस पाटील पदी सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवाराची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे गावांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या भरतीमध्ये अंतिम सूचीत नाव येण्यासाठी काही दलाल नेमून ‘जो देईल तो पोलीस पाटील होईल’ या म्हणीप्रमाणे आधार घेत पोलीस पाटलांची नियुक्ती करण्यात आल्याची उमेदवारांमध्ये चर्चा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जास्त शिक्षण असल्यापेक्षा कमी शिक्षण असलेल्याचा क्रमांक लागला. शिक्षणासोबत अन्य कार्यात व स्पर्धेत भाग घेतल्याचे व क्रमांक पटकावल्याचे प्रशस्तीपत्रक जोडलेल्या गुणांचा उल्लेख कुठेही नाही. तसेच परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमरे नसतानासुद्धा परीक्षा घेणे, अशा अनेक बाबीत चुका आढळून आल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करता पोलीस पाटील पदासाठी घेण्यात आलेली भरती रद्द करुन उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पालकमंत्री बडोले, आ.संजय पुराम यांच्यासह मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून करण्यात आली. (वार्ताहर)