शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना हेल्मेट सक्ती, सहा जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 21:37 IST

हेल्मेटचा वापर न करणाऱ्या सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर मंगळवारी कारवाई करून त्यांच्याकडून तीन हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आाहे. पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना १ आॅक्टोबर पासून हेल्मेट सक्ती जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केली आहे. त्यावरून ही कारवाई करण्यात आली असून या नंतर लवकरच सामान्य नागरिकांवरही हेल्मेट न वापरल्यास कारवाई केली जाणार आहे.

ठळक मुद्देतीन हजार दंड वसूल : लवकरच नागरिकांवरही होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हेल्मेटचा वापर न करणाऱ्या सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर मंगळवारी कारवाई करून त्यांच्याकडून तीन हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आाहे. पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना १ आॅक्टोबर पासून हेल्मेट सक्ती जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केली आहे. त्यावरून ही कारवाई करण्यात आली असून या नंतर लवकरच सामान्य नागरिकांवरही हेल्मेट न वापरल्यास कारवाई केली जाणार आहे.मोटार वाहन अपघातात सर्वाधिक मृत्यू हेल्मेट नसल्यामुळे होतात. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश शासनाला दिले आहेत. परंतु सामान्य जनतेवर कारवाई करण्यापूर्वी ज्यांच्यावर या कारवाईची जबाबदारी आहे त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. त्यासाठीच जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी १ आॅक्टोबर पासून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोटारसायकल चालविताना हेल्मेट सक्ती केली आहे. या संदर्भात मंगळवारी गृहविभागाचे उपअधीक्षक बी.डी. बनसोडे, वाहतूक पोलीस निरीक्षक गाडे व पथकाने कारवाई केली. सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून तीन हजार रुपये वसुल करण्यात आले. ही कारवाई यापुढेही चालू राहणार आहे.पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसोबतच इतर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुद्धा हेल्मेट न वापरल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आयएसआय दर्जाचे हेल्मेट भंडारा पोलीस मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये बाजारभावापेक्षा स्वस्त दरात उपलब्ध असल्याचे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.दुचाकी चालकांनो हेल्मेट वापराचजिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यातही दुचाकी अपघाताची संख्या सर्वाधिक आहे. हेल्मेट न वापरल्याने डोक्याला इजा होऊन मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करणे गरजेचे आहे. नागरिकांनी दुचाकी घेऊन बाहेर जाताताना आयएसआय दर्जाचे हेल्मेट परिधान करूनच प्रवास करावा. असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले.