शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ जखमीजवळ पोलिसांचा पहारा

By admin | Updated: July 10, 2015 01:11 IST

तुमसर येथील सिलिंडर स्फोट प्रकरणी फॉरेन्सीक अहवालाची प्रतिक्षा असून प्रथमदर्शनी स्फोट सिलिंडरचा झाला की अन्य स्फोटक पदार्थ घरात होते,

प्रकरण तुमसरातील सिलिंडर स्फोटाचे : फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा तुमसर : तुमसर येथील सिलिंडर स्फोट प्रकरणी फॉरेन्सीक अहवालाची प्रतिक्षा असून प्रथमदर्शनी स्फोट सिलिंडरचा झाला की अन्य स्फोटक पदार्थ घरात होते, याची चौकशी सुरू आहे. अत्यवस्थ राजेंद्र नागपुरे यांच्यावर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तेथे पोलिसांचा खडा पहारा आहे.दि.४ जुलैच्या रात्री ७.३० वाजता तुमसर येथील गांधी वॉर्डात राजेंद्र नागपुरे यांच्या घरी मोठा स्फोट झाला. या स्फोटात घराजवळील मुन्ना पिथोडे (५५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर राजेंद्र गंभीर जखमी झाला होता. स्फोटाचे हादरे दोन ते अडीच कि़मी. पर्यंत बसले होते. स्फोटात सिलिंडर बाहेर फेकला गेला. दोन खोल्यंची स्लॅब कोसळले होते. मुन्ना पिथोडे यांच्या अंगावर भींत पडून ते दाबले गेले. घरातील सामान सर्वत्र विखुरले गेले होते. किमान १५० ते २०० फूट अंतरावर भांडी फेकल्या गेली. सर्वत्र काचांचा खच पडला होता. घटनेच्या दुसऱ्या दिवशी नागपूर येथून फॉरेन्सीकचे पथक आले होते. प्रथमदर्शनी सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती प्राप्त झाली, परंतु सखोल चौकशी अंती स्फोटाच्या गंभीरतेमुळे हा स्फोट अन्य स्फोटक पदार्थामुळे तर झाला नाही याचा संशय व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती आहे.नागपूर येथील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख जी. एम. रामटेके, एच.पी.सी.एल.चे सेल्स आॅफीसर विवेक सिंग यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. गंभीर जखमी राजेंद्र नागपुरे यांच्यावर नागपूर येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्या रुग्णालयात पोलिसांचा खडा पहारा आहे. या प्रकरणाची गंभीर दखल पोलीस विभागाने घेतल्याने दिसून येते. स्फोटकांचा व राजेंद्रचा काही संबंध आहे काय, स्फोटके कुठून व कां आणली असावी, पुरवठा कोणी केला, स्फोट नेमका कशामुळे झाला. सिलिंडरचा स्फोट झाला तर त्याची स्थिती काय, सिलिंडरचे तुकडे झाले नाहीत, सिलिंडरचा स्फोट झाल्यावर त्याची तिव्रता किती असते, याची संपूर्ण माहिती एचपीसीएल अधिकाऱ्यांकडून पोलीस विभाग घेत असल्याची माहिती आहे. शहरात या स्फोटाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. या प्रकरणात तुमसर पोलिस कमालीची गुप्तता पाळत आहे. (तालुका प्रतिनिधी)