शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

आंतरराज्यीय मार्गावरील पोलीस नियंत्रण कक्ष बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 21:56 IST

आंतरराज्यीय मार्गावर खापा शिवारात पोलीस नियंत्रण कक्षाची स्थापना केल्यानंतर पुन्हा बुधवारी जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या आदेशाने पोलीस नियंत्रण कक्ष आकस्मिक बंद करण्यात आली. यामुळे मध्यप्रदेशाकडे जाणारा मार्ग पुन्हा तस्करांना मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देजिल्हा मुख्यालयाचा आदेश : मध्य प्रदेशाकडे जाणाऱ्या तस्करांना अटकाव नाही

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आंतरराज्यीय मार्गावर खापा शिवारात पोलीस नियंत्रण कक्षाची स्थापना केल्यानंतर पुन्हा बुधवारी जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या आदेशाने पोलीस नियंत्रण कक्ष आकस्मिक बंद करण्यात आली. यामुळे मध्यप्रदेशाकडे जाणारा मार्ग पुन्हा तस्करांना मोकळा झाला आहे. सध्या मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुका होऊ घातले आहे. रोख व मद्याची खेप या मार्गाने जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.तुमसर-भंडारा-गोंदिया-रामटेक हा प्रमुख राज्यमार्ग असून बालाघाट व वाराशिवनी येथे हा आंतरराज्यीय मार्ग खापा शिवारातून जातो. सध्या मनसर-गोंदिया-बालाघाट हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू राहते. खापा शिवारात पोलीस प्रशासनाने वाहतूक नियंत्रणाकरिता कापडी तंबूत पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन केले होते. यामुळे असा मागील तत्व व वाहतूक व्यवस्थेत मोठा परिणाम झाला होता.खापा चौक ते तुमसर शहराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. तुमसर तालुक्यात जगप्रसिद्ध मॅग्नीज खाणी तथा मॅग्नीजचे मोठे साठे आहेत. मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक सुरू आहे. बालाघाट, कटंगी, शिवनी, जबलपूर मार्गे मॅग्नीज मिश्रीत धातंूचे ट्रक याच मार्गाने धावतात. वनसंपदा तालुक्यात मोठी आहे. गोंदिया-रामटेक-मनसर मार्गही चोवीस तास सुरू असतो. दोन राज्यांना जोडणाºया रस्त्यावर मुख्य चौकात अस्थायी पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय पोलीस विभागाने घेतला. त्याचे चांगले परिणाम पुढे आले. परंतु बुधवारी सकाळी पोलिसांनी लाकडी तंबू तत्काळ हटविण्यात आला. यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.मध्यप्रदेशात विधानसभेच्या निवडणुका केवळ आठ दिवसावर येवून ठेवल्या आहेत. यापूर्वी नागपूर पांढरकवडा, छिंदवाडा मार्गावर रोख रक्कम नेतानी पोसिलांनी पकडले. तुमसरमार्गे बालाघाट, वारासिवनी, कटंगी येथे सहज जाता येते. तपासणी व चौकशी केंद्र सीमेवर दिसत नाही. केवळ सोपस्कार म्हणून ती आहेत. वनविभागाची चौकशी व तपासणीही थातुरमातुर केली जाते. बालाघाट जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. रोख व मद्याची खेप नेण्यातील मुख्य अडसर खापा चौकातील पोलीस नियंत्रण कक्ष होते. बुधवारी ती हटविल्याने सदर मार्ग मोकळा झाला. पोलीस मुख्यालयाने दिलेल्या आदेशाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. पोलीस चौकी कां हटविली हा संशोधनाचा विषय आहे. येथे ट्रक चालकांची लॉबी सक्रीय असल्याचे बोलले जात आहे.खापा चौकातील पोलीस चौकी बुधवारी सकाळी बंद करण्यात आली. जिल्हा मुख्यालयातून तसे आदेश प्राप्त झाले. मागील दीड महिन्यापुर्वी पोलीस चौकी आदेशान्वये स्थापन करण्यात आली होती.-मनोज सिडाम,पोलीस निरीक्षक तुमसर.