शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

बामणी रेती घाटावर पोकलॅन्ड, जेसीबीने रेती खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2017 00:17 IST

तुमसर तालुक्यातील वैनगंगा नदीवरील बाह्मणी रेती घाटावरून पोकलॅन्ड, जेसीबीसह अन्य यंत्राने रेतीचे नियमबाह्य सर्रास खनन सुरू आहे.

महसूल प्रशासनाचे मौन : राजकीय संबंधामुळे कारवाई करण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळमोहन भोयर तुमसरतुमसर तालुक्यातील वैनगंगा नदीवरील बाह्मणी रेती घाटावरून पोकलॅन्ड, जेसीबीसह अन्य यंत्राने रेतीचे नियमबाह्य सर्रास खनन सुरू आहे. नदीपात्रात सीमांकनाचा पत्ता नाही. रेती खननामुळे जमिनीचा तळ गाठला आहे. येथे महसूल प्रशासनाने मौन धारण केल्याचे दिसून येत आहे. राजकीय पदाधिकारी या रेती घाटाच्या व्यवसायात गुंतलेले असल्यामुळे या रेती घाटाकडे कुणी फिरकत नसल्याचे वास्तव आहे.महसूल प्रशासनाने सन २०१६-२०१७ वर्षाकरिता वैनगंगा नदीवरील बाह्मणी रेती घाटांचा लिलाव केला. विस्तीर्ण नदी पात्र, पांढरी शुभ्र रेती, रेती घाटावर जाण्याकरिता पक्का रस्ता असे या रेती घाटाचे वैशिष्ट्य आहे. नदीतील ३७४ गटक्रमांकांचे ४.५ हेक्टर क्षेत्र २ कोटी ३३ लाख रूपये, ३७१ गट क्रमांकांचे ४.५० हेक्टर क्षेत्र १ कोटी ३१ लाख रूपयात लिलाव झाला आहे. बाह्मणी नदी पात्रात दोन यंत्रांच्या साहाय्याने रेतीचे खनन सुरु आहे. यात एक जेसीबी व एक पोकलँडचा समावेश आहे.नियमानुसार एक मीटरपेक्षा जास्त रेतीचा साठा गरजेचे आहे. परंतु या नदी पात्रात सुमार रेती खननामुळे काळी माती दिसत आहे. रेती घाटावर नियमानुसार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची गरज आहे. परंतु तेही येथे दिसत नाही. दरवर्षी हा रेती घाट लिलाव होतो. तुमसरपासून अवघ्या चार कि.मी. अंतरावर हा रेतीघाट आहे. नदीपात्रात महसूल प्रशासनाने सीमांकन नक्कीच करून दिले असणार. परंतु सध्या सीमांकन कुठून कुठपर्यंत आहे तेही दिसत नाही.तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक व अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नदी घाटावर पाहणी करून कागदोपत्री अहवाल सादर करणे असा काम येथे सुरु आहे. बाह्मणी रेती घाटापासून तीन कि.मी. अंतरावर वैनगंगा नदीवरील चारगाव रेती घाट लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु येथे रेती खनन सुरु करण्यात आले नाही. येत्या दोन ते तीन दिवसात तेथेही रेती उपसा सुरु होणार आहे. चारगाव येथे गट क्रमांक ७० मधील ४.५० हेक्टर १ कोटी २७ लाख ७८६ रूपयात या घाटाचा लिलाव झाला आहे. कोट्यवधींना जाणारा हा रेती घाट लिलावानंतर केवळ कागदोपत्रीच येथे कारवाई सुरु राहते. महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाई करावी असा नियम आहे. मोहाडी तालुक्यातील निलज घाटावर रात्री पोलिसांनी धडक कारवाई केली होती. येथे रात्री रेतीचे उत्खणन सुरु होते. बाह्मणी व चारगाव रेतीघाटाशी राजकीय पदाधिकाऱ्यांचे संबंध आहे. त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासन या घाटाकडे कुणी ढुंकूनही पाहत नसल्याची वास्तविकता आहे.तालुक्यातील बाह्मणी रेती घाटाचे लिलाव झाले त्याचवेळी सीमांकन करून देण्यात आले आहे. या घाटावर वेळोवेळी जाऊन पाहणी केली जाते. परंतु असा प्रकार दिसून आला नाही. यंत्राने रेती खनन सुरु असल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. -डी.टी. सोनवाने,तहसीलदार तुमसर